शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत आरोपीला अटक

आरोपी पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच रस्त्यात पोलिस आणि आरोपींमध्ये चकमक उडाली. आरोपींनी केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी स्वरक्षणार्थ चोख प्रतिउत्तर देत काही आरोपींना अटक केली.

शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत आरोपीला अटक
SHARES

गुजरातमध्ये अंगाडियाला शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मालाड येथून अटक केली आहे. सुधीर दत्तात्रय शिंदे असं या आरोपीचं नाव आहे. शिंदे विरोधात नवी मुंबई, मुंबई, गुजरात मधील पोलिस ठाण्यात १५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर सुधीरला गुजरातच्या पाटण पोलिसांच्या हवाली केलं आहे.


पोलिसांबरोबर चकमक

गुजरातच्या पाटण परिसरातील एका व्यापाऱ्याला १३ आॅगस्ट रोजी शस्त्राचा धाक दाखवून पावणे सात लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम आरोपींनी लुटली होती. ही माहिती मिळताच तेथील सीटीबी डिव्हिजन स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच रस्त्यात पोलिस आणि आरोपींमध्ये चकमक उडाली. आरोपींनी केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी स्वरक्षणार्थ चोख प्रतिउत्तर देत काही आरोपींना अटक केली. त्या आरोपींच्या चौकशीत या कटातील मुख्य आरोपी सुधीर शिंदेचं नाव पुढं आलं. शिंदे हा मुंबईला पळून गेला असल्याची माहिती पोलिसांना दिली. 


हत्येतील आरोपी 

मागील काही दिवसांपासून मालाडच्या पठाणवाडीत शिंदे हा राहत होता. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल माने यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून शिंदेला अटक केली. १९९१ पासून शिंदेवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २००४ साली जोगेश्वरीत डाॅक्टरच्या घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या शिंदेने त्या डाॅक्टरची हत्या केल्याचं प्रकरण गाजलं होतं. गुजरातमधील चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिंदेला पाटण पोलिसांच्या हवाली केलं आहे.



हेही वाचा  -

ओशिवरात नैराश्येतून माॅडेल तरूणीची आत्महत्या

सामूहिक अत्याचार झालेल्या मुलीची मृत्यूशी झुंज संपली

उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा