कारवाईची काढत होता शुटींग, पोलिसांसमोर हुशारी महागात पडली

लाँकडाऊनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन वेळोवेळी करत आले आहेत. मात्र तरीही काही बेशिस्त नागरिक शासनांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून नियम पायदळी तुडवत असल्याचे अनेकदा पहायला मिळाले.

कारवाईची काढत होता शुटींग, पोलिसांसमोर हुशारी महागात पडली
SHARES

लायसन्स नसताना विनाकारण घराबाहेर पडलेल्या तरुणाला  पोलिसांनी नाकाबंदीत पकडले. त्यावेळी पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत अरेरावी करून, पोलिसांचा व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे.  वडाळा पोलिसांनी त्याच्या विरोधात लाॅकडाऊनचे उल्लघंन आणि शासकिय गुपित अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचाः- भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

मुंबईत कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना. शासनाने विनाकारण बाहेर पडू नये, लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन वेळोवेळी करत आले आहेत. मात्र तरीही काही बेशिस्त नागरिक शासनांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून नियम पायदळी तुडवत असल्याचे अनेकदा पहायला मिळाले. विना कारण बाहेर फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी नाकाबंदी लावून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान १७ सप्टेंर रोजी वडाळा ब्रीजवर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. त्यावेळी आरोपी मुकेश अतर सिंग(३१) हा त्याचा मित्रा मनोज शुक्लासोबत रात्री विना मास्क संशयित रित्या दुचाकीवरून फिरत होता. पोलिसांनी त्याच्याजवळ विचारपूस केली असता. तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला.

हेही वाचाः- लोकलसाठी मनसेचा सविनय कायदेभंग

त्यानुसार पोलिसांनी दोघांना वडाळा पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले. पोलिस त्यांच्यावर लाॅकडाऊनचे उल्लघंन केल्याप्रकरणी कारवाई करत असताना. मुकेश पोलिस ठाण्यात मोबाइलच्या कॅमेऱ्याने चित्रीकरण करत होता. याची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल काढून घेत तपासला. त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडिओ आढळून आल्यानंतर त्याच्या विरोधात भादंवि कलम १८८,२६९, २७० सह शासकीय गुपिते अधिनियम १९२३ कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाला पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई आनंदा खाडे(३३) याच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा