कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई

सर्व टिव्ही चॅनेल्स, सर्व वृत्तपत्रे यांनी कोरोना विषाणूसंदर्भातील कोणतीही बातमी खातरजमा करुनच प्रसारीत करावी, असे आवाहनही करण्यात आले

कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई
SHARES

सध्या जगात सगळीकडे पसरणारा कोरोना हा विषाणू देशात व राज्यात गतीने पसरत आहे. कोरोना विषाणूविषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा (उदा : फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्यूब, टिकटॉक व अन्य प्लॅटफार्म) मोठय़ा प्रमाणात वापर केला जात असल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महाराष्ट्र सायबर कार्यालयाने खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणार्‍यांना कारवाईचा इशारा दिला आहे.

हेही वाचाः- Coronavirus Update: म्हणून कोरोना बळीचा अंत्यविधी पत्नी, मुलाशिवाय...

महाराष्ट्र सायबरच्या असे निदर्शनास आले आहे की, समाजातील काही विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक समाजमाध्यमाद्वारे यासंदर्भात मुद्दाम खोट्या बातम्या व अफवा पसरवून समाजात व नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. महाराष्ट्र सायबरने सर्व नागरिकांना अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी न होण्याचे व त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून समाजात भीती व दहशतीचे वातावरण पसरण्यास आणि गंभीर समस्या निर्माण होण्यापासून प्रतिबंध होईल. सर्व टिव्ही चॅनेल्स, सर्व वृत्तपत्रे यांनी कोरोना विषाणूसंदर्भातील कोणतीही बातमी खातरजमा करुनच प्रसारीत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचाः भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी शरद पवारांचीही होणार चौकशी

नागरिकांनी अफवा पसरविणार्‍या लोकांच्या तक्रारी स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये नोंदवाव्या. सार्वजनिक आरोग्य विभागानेही अधिसूचना जाहीर केलेली आहे. त्यानुसार कोणतीही व्यक्ती/संस्था कोरोना विषाणूबाबत खोट्या बातम्या अगर अफवा पसरवताना आढळल्यास त्यांना साथरोग प्रतिबंध कायदा, १८९७च्या कलम 0३ अन्वये नमूद केल्याप्रमाणे जबाबदार धरले जाईल. असे कृत्य भारतीय दंड संहिताअन्वये दंडनीय अपराध असल्याचे समजले जाईल. या अधिसूचनेचे पालन न करणार्‍यांवर कायदेशिर कारवाई करण्याची सूचना महाराष्ट्र सायबर कडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र सायबरने या अधिसूचनेद्वारे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोरोना विषाणू संदर्भातील फक्त अधिकृत माहिती व बातम्यांवरच विश्‍वास ठेवावा.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा