वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या बाप-लेकाला अटक

मुंबईत बेशिस्त चालकांवर कारवाई केल्याच्या रागातून ताडदेवमध्ये बाप आणि लेकाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी जॅक्शन मुनवानी, जय मुनवानी या दोघांना अटक केली आहे.

वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या बाप-लेकाला अटक
SHARES

मुंबईत बेशिस्त चालकांवर कारवाई केल्याच्या रागातून ताडदेवमध्ये बाप आणि लेकाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी जॅक्शन  मुनवानी, जय मुनवानी या दोघांना अटक केली आहे.


१५ एप्रिलपर्यंत कोठडी

ताडदेव वाहतूक चौकीत पोलीस नाईक सानप हे कर्तव्यावर असचाना अचानक मुकवानी हे त्यांची गाडी घेऊन नो एन्ट्रीत घुसले. त्यावेळी सानप यांनी त्यांची गाडी अडवत चूक लक्षात आणून दिली.  त्यांच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी सानप गेले असताना कारवाई करू नये यावरून मुकवानी आणि सानप यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यावेळी राग अनावर झालेल्या मुकवानी बाप-बेट्याने सानप यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मिडियावर वायरल झाला. त्यानंतर गावदेवी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५३, ३३२ ५०४,५०६, ३४ मोटार वाहन कायदा कलम  १२२, १७(१)/१७७, १७९ अन्वये गुन्हा नोंदवत दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा -

मुलांधील पब्जीच्या वेडाला पालकच जबाबदार, उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींना २० वर्षांचा सश्रम कारावास




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा