शस्त्रखरेदीसाठी माओवाद्यांचं ८ कोटींचं अंदाजपत्रक

आरोपींकडे टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये हजारो कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यातून आरोपी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या संपर्कात होते असं अाढळून अालं अाहे. तसंच यावेळी एका पत्रातून या माओवाद्यांचे शस्त्रांसाठी वार्षिक ८ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक असल्याचं उघड झालं आहे

SHARE

देशात सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी लेखक, वकील व विचारवंतांचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाशी( माओवादी) संबंध असल्याचं उघडकीस आलं आहे. माओवाद्यांच्या मदतीनेच देशभरात हिंसक कारवायांद्वारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करून सरकार उलथवून टाकण्याचा कट त्यांनी आखला होता. अटक आरोपींकडून मिळालेल्या पत्रातून माओवाद्यांचे शस्त्रखरेदीसाठी आठ कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक असल्याचं समोर अाल्याचं पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंग यांनी सांगितलं.


नेपाळमधून शस्त्रे खरेदी

नक्षलवाद्यांशी संबंधीत असल्यावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या अॅड. सुधा भारद्वाज, कवी पी वरावर राव, स्वयंसेवी गौतम नवलखा, वकील अरुण फरेरा व वेर्नोन गोन्साल्विस यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे असल्याचे सिंग यांनी महासंचालक कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत सांगितले. हे सर्व पुरावे गोळा करताना व्हिडीओ रेकाॅर्डींग करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ओरिजनल कागदपत्रेही न्यायवैद्यक प्रयोग शाळेकडे असून पोलिस फर्स्ट काॅपीच्या आधारावर तपास करत आहेत. या माओवाद्यांचे ओव्हरग्राऊंड केडर असून हा गट युद्धासारखी परीस्थिती निर्माण करण्यासाठी नेपाळ येथून शस्त्रे खरेदी करण्याच्या प्रयत्नात होता. याबाबतची पत्रे पोलिसांच्या हाती लागल्याचे सिंग यांनी सांगितलं.


चीन,रशियन शस्त्रांचे कॅटलॉग 

आरोपींकडे टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये हजारो कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यातून आरोपी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या संपर्कात होते असं अाढळून अालं अाहे. तसंच यावेळी एका पत्रातून या माओवाद्यांचे शस्त्रांसाठी वार्षिक ८ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक असल्याचं उघड झालं आहे. माओवादी ४ लाख काडतुसे व एम ४ ग्रेनेड लाँचर नेपाळमधून मागवणार होते. यावेळी चीन व रशियन शस्त्रांचे कॅटलॉग आरोपींच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. तसंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) मधील काही विद्यार्थांना दुर्गम भागातून छुपे प्रशिक्षण देण्याबाबतच्या संभाषणाचे पत्रही पोलिसांना सापडलं आहे. हेही वाचा - 

'स्टॅटर्जी आॅफ टॅक्टीस इन इंडिया' नुसार नक्षलवाद्यांनी अाखली व्यूहरचना

नक्षलवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट- पोलिस
संबंधित विषय
ताज्या बातम्या