बिहारमधील आणखी एका कलाकाराची मुंबईत आत्महत्या

बिहारच्या मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा रहिवाशी असलेला अक्षत मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Film Industry) कार्यरत होता.

बिहारमधील आणखी एका कलाकाराची मुंबईत आत्महत्या
SHARES

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा गुंता सुटत नाही तोच आणखी एका बिहारच्या नवोदीत कलाकाराने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. अक्षत उत्कर्ष (२६) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र अक्षतची हत्या झाल्याचा संशय़ त्याच्या घरातल्यांनी व्यक्त केला आहे.  

हेही वाचाः- चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड

मूळचा बिहारच्या मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा रहिवाशी असलेला अक्षत मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Film Industry) कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार तो बॉलिवूडमधील नवोदित कलाकार होता. हिंदी चित्रपट आणि कार्यक्रमात छोटे मोठे रोल तो करत असल्याचे सांगितले. अक्षत हा अंधेरीतील गोकुळ बिल्डिंग, आरटीओ लेन अंधेरी पश्चिम येथे रहात होता. मंगळवारी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ठ झाले नसून पोलिस त्या अनुशंगाने तपास करत आहेत.  

हेही वाचाः- राज्यात लाॅकडाऊन दरम्यान २८ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल

दिवंगत अभिनेत्याचे मामा रंजित यांनी अशी माहिती दिली आहे की, रविवारी रात्री९ वाजता अक्षतने त्याच्या वडिलांशी बातचीत केली होती. त्यानंतर उशिरा रात्री त्याच्या मृत्यूची बातमी कळली. त्याचप्रमाणे अक्षतच्या मामांनी मुंबई पोलीस यामध्ये सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा रहिवासी असून विजयंत चौधरी उर्फ राजू चौधरी यांचा तो मुलगा होता. त्याचा मृतदेह मुंबईहून त्याच्या राहत्या ठिकाणी पोहोचवण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा