CAA विरोधात बोलला, उबेर चालक थेट घेऊन गेला पोलीस ठाण्यात

गाडीत दोघांमध्ये CAA आणि NRC वरून चर्चा सुरू होती. त्यावरून दोघांमध्ये मतभेद ही झाले. त्यावेळी राग अनावर झालेल्या रोहितने कवी बप्पादित्यच्या न कळत,गाडी सांताक्रूझ पोलिस ठाण्याच्या दिशेने वळवली.

CAA विरोधात बोलला, उबेर चालक थेट घेऊन गेला पोलीस ठाण्यात
SHARES

देशात CAA आणि NRC विरोधात ठिक ठिकाणीआंदोलन सुरू असताना. काहींनी  CAA आणि NRC ला पाठिंबा दिल्याने नागरिकांच्या मनात दुफळी निर्माण झाली आहे. नुकतेच एका उबेर चालक आणि जयपूरमधील कवी बप्पादित्य सरकार यांच्यामध्ये वाद झाला. उबेर चालकाला राग अनावर झाल्याने हा वाद पुढे सांताक्रूझ पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. या दोघांमधील हा घटनक्रम ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन असोसिएशनच्या सचिव कविता कृष्णन यांनी ट्विटर पोस्ट करत सगळा घटनाक्रम सांगितला आहे.

हेही वाचाः- आता वॉर्डांची ओळख रंगावरून होणार

 जयपूरमधील कवी बप्पादित्य सरकार ३ फेब्रुवारीला काला घोडा फेस्टिव्हलमध्ये  सादरीकरण केलं. त्यानंतर तो नागपाडा येथे सीएए-एनआरसीविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन घरी जाण्यासाठी निघाला होता. घरी जाताना तो  जुहू येथे मित्राला भेटून कुर्ला येथे घरी जाण्यासाठी त्याने रोहित सिंहच्या उबेर गाडी बसला. गाडीत दोघांमध्ये CAA आणि NRC वरून चर्चा सुरू होती. त्यावरून दोघांमध्ये मतभेद ही झाले. त्यावेळी राग अनावर झालेल्या रोहितने कवी बप्पादित्यच्या न कळत,गाडी सांताक्रूझ पोलिस ठाण्याच्या दिशेने वळवली.

पोलिस ठाण्याबाहेर गाडी लावल्यानंतर रोहित सिंह एटीएममधून पैसे काढण्यासाठी जातो असे सांगून पोलिस ठाण्यात गेला. पोलिस ठाण्यात जाऊन त्याने कवी बप्पादित्य हे CAA आणि NRC बोलत असल्याचे तक्रार त्याने पोलिसांना करत, कवी बप्पादित्य याला अटक करण्याची मागणी केली. ते पाहून बप्पादित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांसमोर रोहित कवी बप्पादित्यला ‘तुम्ही लोक आमचा देश नष्ट करायला निघाले असताना’ आम्ही फक्त पाहत बसायचं का ? असं ओरडत तो पोलिसांकडे अटकेची मागणी करु लागला.

हेही वाचाः- ग्रँट रोड व गोरेगावकरांना 'बेस्ट'चा दिलासा

 रोहित सिंह पोलिसांना सांगू लागला की, “तुम्ही याला अटक करा. हा देश जाळण्याबद्दल बोलत होता. माझ्याकडे सगळी रेकॉर्डिंग आहे”. पोलिसांनी यानंतर जवळपास दोन तास बप्पादित्य सरकारची चौकशी केली. वकिलाने मध्यस्थी केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. यावेळी जातानाही पोलिसांनी त्याला गळ्यात लाल स्कार्फ घालू नको, तसंच नेहमी हातात डफली घेऊन फिरु नको. सध्या नाजूक वेळ आहे असा सल्ला दिला.

पोलिसांनी बप्पादित्य सरकारकडे त्याचं कुटुंब, नोकरी, मित्र आणि विचारसरणी या सगळ्याबद्दल चौकशी केली. पोलिसांनी त्याचे व्हॉट्सअॅप चॅट तसंत फोन रेकॉर्डही तपासून त्याला सोडून दिले. “टॅक्सी चालकाचं एक वाक्य सतत माझ्या डोक्यात फिरत आहे. मी तुला कुठेही घेऊन गेलो असतो पण आभार मान पोलीस ठाण्यात घेऊन आलो,” असं बप्पादित्य सरकारने सांगितले.या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बप्पादित्य सरकार देशभरातील अनेक फेस्टिव्हलमध्ये सहभागी असतो.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा