जामीन फेटाळल्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उचललं 'हे' पाऊल

आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टानं फेटाळून लावला आहे.

जामीन फेटाळल्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उचललं 'हे' पाऊल
SHARES

मुंबईच्या एनडीपीएस कोर्टानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे.

हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आजचं कामकाज बरखास्त केलं होतं. त्यामुळे आर्यनच्या जामीन अर्जावर हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. या कारणास्तव आर्यन खानला आजची रात्र तुरुंगात राहावं लागणार आहे. उद्या साडेदहानंतर हायकोर्टाचं कामकाज सुरू होणार त्यावेळी सदर प्रकरण न्यायमूर्तीं समोर येण्याची शक्यता आहे.

आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा या तिघांचाही जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टानं फेटाळून लावला आहे. आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीनं त्याची कोठडी मागितली आहे. आर्यनचा संपूर्ण कटात समावेश असल्याता आरोप एनसीबीनं केला आहे. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगातील तिघांचा मुक्काम वाढला आहे.

जामीनासाठी चाललेल्या सुनावणीत NCBकडून काही पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, NCBच्या हाती लागलेल्या आर्यनच्या काही चॅटमध्ये तो एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतोय. सुनावणीदरम्यान एनसीबीनं ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले.

असंही म्हटलं जात आहे की, ही अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीनं तिला सोडून दिलं होतं. येत्या काळात या अभिनेत्रीची एनसीबी टीमकडून चौकशी केली जाऊ शकते. ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

याशिवाय, जामिनावरील सुनावणीपूर्वी काही ड्रग पॅडलरसोबतचे आर्यनचे चॅटदेखील न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.


हेही वाचा

ड्रग्स प्रकरण : आर्यनशी व्हॉट्सअॅपवर चॅट करणारी अभिनेत्री कोण?

शाहरुखला पुन्हा धक्का, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा