आशापुरा लि. कंपनीचे हर्षद ठक्कर बेपत्ता

आशापुरा इन्टिमेट्स फॅशन लिमिटेडच्या दादरमधील कार्यालयात ठक्कर कार्यरत असायचे. २ आॅक्टोबर रोजी ते कार्यालयात शेवटचे दिसले होते. मात्र, कार्यालयातत ते त्यांचे मोबाइल, पाकिट, पासपोर्ट ठेवून गेले. रात्री घरी न परतल्यामुळे ठक्कर कुटुंबीय त्यांचा शोध घेऊ लागले.

आशापुरा लि. कंपनीचे हर्षद ठक्कर बेपत्ता
SHARES

देशभरात अंर्तवस्त्रांस्ठी प्रसिद्ध असलेल्या आशापुरा इन्टिमेट्स फॅशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हर्षद ठक्कर हे बेपत्ता झाले आहेत. शेअर मार्केटमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे ते २ ऑक्टोबरपासून घरीच आलेले नाहीत. या प्रकरणी ठक्कर कुटुंबीयांनी दादर पोलिसांकडे हरवल्याची तक्रार नोंदवली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 


कार्यालयात चिठ्ठी मिळाली

आशापुरा इन्टिमेट्स फॅशन लिमिटेडच्या दादरमधील कार्यालयात ठक्कर कार्यरत असायचे. २ आॅक्टोबर रोजी ते कार्यालयात शेवटचे दिसले होते. मात्र, कार्यालयातत ते त्यांचे मोबाइल, पाकिट, पासपोर्ट ठेवून गेले. रात्री घरी न परतल्यामुळे ठक्कर कुटुंबीय त्यांचा शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांच्या दादर येथील कार्यालयात त्यांना हर्षद यांनी गुजराती भाषेत लिहिलेली चिठ्ठी मिळाली होती. त्यात त्यांनी कंपनीच्या शेअर्ससाठी मी माझी संपत्ती गहाण ठेवली आहे. शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानामुळे कंपनीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी कधीही कुणाला फसवले नाही. मात्र,  गुंतवणूकदारांच्या नुकसानासाठी मी कारणीभूत आहे हे मला सहन होत नाही. माझ्या विम्यातून येणारी रक्कम कंपनीला द्यावी, असं त्यांनी त्या चिठ्ठीत म्हटलं आहे. 


अज्ञात मृतदेह

शेअर मार्केटमध्ये चालू असलेल्या घसरणीमुळे  कंपनीचा शेअर्स ४४५ रुपयांवरून थेट १२५ रुपयांवर अाला. परिणामी कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे हर्षद नैराश्येत गेले अाहेत. ठक्कर यांचा शोध आता पोलिस घेत आहेत. ठक्कर यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांचे डीएनए घेतले अाहे. मरीन ड्राईव्हवर मिळालेल्या एक अज्ञात मृतदेहची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे समजते.



हेही वाचा - 

राखी सावंतविरोधात तनुश्रीचा १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

घाटकोपरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा