Corona virus : कोरोना बरा करण्याच्या नावाखाली दिल्या अन्न पचनाच्या गोळ्या, पोलिसांची कारवाई

कोरोना संसर्ग बरा करण्याच्या नावाखाली चक्क अन्न पचनाच्या गोळ्या दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली

Corona virus : कोरोना बरा करण्याच्या नावाखाली दिल्या अन्न पचनाच्या गोळ्या, पोलिसांची कारवाई
SHARES

मुंबईकरांनी कोरोना संसर्गाची इतकी धास्ती घेतली आहे, की गजबजलेले रस्त्यांवर आज शुकशुकाट पहायला मिळत आहे. अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन अनेकांनी स्वतःचे खिस्से भरण्याचे उद्योग सुरू केले आहे. कोरोना संसर्गाच्या नावावर आतापर्यंत बाजारात मास्क आणि बनावट सॅनेटाइझरची विक्री केली जात होती. मात्र आता तर कोरोना बरा करण्याच्या नावाखाली  चक्क अन्न पचनाच्या गोळ्या दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

 हेही वाचाः- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्य ठाकरेंची संस्थांना तंबी

 मुलुंडच्या आरआरटी रोडवर असलेल्या शीतल आयुर्वेदिक भांडारमध्ये चक्क कोरोनावर उपाय म्हणून गोळ्या मिळत असल्याची जाहिरात करण्यात आली होती. कोरोनाच्या धास्तीने गोळ्या खरेदी करण्यासाठी दुकानात नागरिकांची तुंबळ गर्दी होत होती. एक पॅकेट जवळपास दीडशे रुपयांना विकले जात होते. कोरोना न होण्यासाठी आणि लक्षण आढळल्यास या आयुर्वेदीक गोळीचे गरम पाण्यातून सेवन केल्यास कोरोना संसर्ग होत नसल्याची जाहिरात दुकान मालकाने केली होती. गल्लोगल्ली या दुकानाची आणि कोरोनावर आयुर्वेदीक औषधाची चर्चा रंगली होती. दिवसभरात मास्क आणि आयुर्वेदीक गोळीच्या नावावर दुकानदाराने आपला गल्ला भरून घेतला. 

 हेही वाचाः- मुंबईतील लोकल ट्रेन, मेट्रो बंद करणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर

दुकानदाराच्या या क्लुप्तीची माहिती अन्न व प्रशासन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी दुकानात जाऊन दुकान मालकावर कारवाई केली. अन्न पचन्नासाठी दिल्या जाणा्या गोळ्या दुकान मालक कोरोना संसर्ग रोगाच्या नावाखाली विकत असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणत अश्या प्रकारच्या गोळ्यांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या बाबतची कारवाई सुरू होती. नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी न पडता, कुठलाही आजार उद्भवल्यास शासकिय रुग्णालयातील डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा