४० लाखांची ऐतिहासिक नाणी जप्त, चौघांना अटक


४० लाखांची ऐतिहासिक नाणी जप्त, चौघांना अटक
SHARES

आझाद मैदान पोलिसांनी ऐतिहासिक नाणी आणि स्टॅम्प चोरीचा छडा लावला असून या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुघल पूर्व कालीन, मुघलकालीन तसेच ब्रिटिश काळातील ऐतिहासिक नाणी, नोटा आणि स्टॅम्प असा एकूण ४० लाखांचा ऐवज जप्त केला आहे.


कुठे झाली होती चोरी?

मुंबईच्या धोबीतलाव परिसरात 'इंटरनॅशनल स्टॅम्प अॅण्ड कॉइन्स' नावाचं जुनं दुकान आहे. या दुकानात ४ सप्टेंबरला चोरी झाली होती. बनावट चावीच्या मदतीने दुकान उघडून २० लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होती. विशेष म्हणजे याच दुकानात गेल्या वर्षी मार्च महिन्यात देखील चोरी झाली होती. त्यावेळी खिडकीतून दुकानात शिरुन चोरांनी ७४ लाखांचा ऐतिहासिक ऐवज चोरला होता.



एकाच दुकानात दुसऱ्यांदा चोरी झाल्यावर या चोरीत ओळखीच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला. या प्रकरणी तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर दिनेश खाडे (२३) या दुकान मालकाच्या मित्राला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याचं कबूल केलं. त्याच्यासह पोलिसांनी विजय वाघमारे (१९) विनोद जाधव (२३) आणि प्रफुल शिंदे (२३) या साथीदारांना देखील अटक केली आहे.

दोन्ही गुन्ह्यातील ४० लाखांचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून त्यात मुघल पूर्व कालीन, मुघलकालीन, ब्रिटिशकालीन नाणी, ऐतिहासिक भारतीय आणि विदेशी चलन, जुने पोस्टल स्टॅम्प असा ऐवज जप्त केल्याची माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत वाखारे यांनी दिली आहे.



'अशी' बनवली बनावट चावी

या गुन्ह्याचा सूत्रधार आरोपी दिनेश खाडे दुकान मालक अब्दुल शेख यांचा मित्र होता. तो वरचेवर दुकानात यायचा. ऑगस्ट महिन्यातील एका दिवशी दुकान मालक नमाजला गेले असताना दिनेशने संधी साधली आणि दुकानाच्या चाव्या घेऊन मालक परत येण्यापूर्वी बनावट चाव्या बनवल्या. त्यानंतर त्याने मूळ चाव्या होत्या तिथेच ठेवल्या. आठच दिवसात बनावट चाव्यांच्या मदतीने दिनेशने दुकानात चोरी केली.



हेही वाचा

धक्कादायक! नवऱ्याने केला अनैसर्गिक सेक्स, सासू, नणंदेनं केलं चित्रीकरण

एकतर्फी प्रेमातून चिमुरड्यांचं अपहरण, पोलिसांनी केली सुखरूप सुटका

फोर्टमध्ये सापडला फाटक्या नोटांचा खच!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा