कर्ज थकवल्याने उन्मेष मनोहर जोशींची मालमत्ता जप्त

या कर्जासाठी उन्मेष जोशी, माधवी उन्मेष जोशी, अनघा मनोहर जोशी आणि कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन हमीदार होते. मात्र कर्ज फेडले जात नसल्यामुळे पहिल्यांदा जानेवारी मे २०१७ मध्ये उन्मेष यांच्या मालमत्तेवर बँकांनी जप्तीची कारवाई केली.

कर्ज थकवल्याने उन्मेष मनोहर जोशींची मालमत्ता जप्त
SHARES

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कुर्ला आणि लोणावळा येथील मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. उन्मेषने ३ सरकारी बँकांकडून ६८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.   

 

जोशींनी कर्ज थकवलं

विकासक उन्मेष यांनी कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्याकडून काही कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टने बँक ऑफ महाराष्ट्राचे १२ कोटी ७९ लाख आणि अन्य ३ कोटी ३ लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३८ कोटी ६३ लाख रुपये, बँक ऑफ इंडियाचे १३ कोटी १८ लाख रुपये थकविले आहेत, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. या बँकांनी मालमत्ता जप्तीसंदर्भात जाहिरातही प्रसिद्ध केली होती.


मालमत्तेवर जप्ती

या कर्जासाठी उन्मेष जोशी, माधवी उन्मेष जोशी, अनघा मनोहर जोशी आणि कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन हमीदार होते. मात्र कर्ज फेडले जात नसल्यामुळे पहिल्यांदा जानेवारी  मे २०१७ मध्ये उन्मेष यांच्या मालमत्तेवर बँकांनी जप्तीची कारवाई केली. त्यानंतर वेळोवेळी हमीदारांना बँकेकडून नोटीस पाठवण्यात आल्या. तरीही कर्ज फेडले जात नसल्यामुळे वित्तीय मत्तेची सुरक्षितता आणि सुरक्षा हित अंमलबजावणी नियम, २००२ मधील तरतुदींनुसार उन्मेष यांची कुर्ला आणि लोणावळा येथील मालमत्तेवर बँकांनी जप्तीची कारवाई केली.
हेही वाचा-

हिमालय पूल दुर्घटना : स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक

पगार पुढे ढकलल्यामुळे बेस्ट कामगारांचे आज आंदोलन
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा