एटीएममध्ये मदत घेत असाल तर सावधान !

वृद्ध नागरिकांना एटीएम वापरताना अनेक अडथळे येत असतात. याच संधीचा फायदा घेऊन काही भुरटे चोर मदतीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करत असल्याच्या घटना मुंबईत दिवसेंदिवस वाढत अाहेत.

एटीएममध्ये मदत घेत असाल तर सावधान !
SHARES

अनेकदा एटीएममध्ये पैसे काढता आपण अनोळखी व्यक्तींची मदत घेतो. विशेषतः वृद्ध नागरिकांना एटीएम वापरताना अनेक अडथळे येत असतात. याच संधीचा फायदा घेऊन काही भुरटे चोर मदतीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करत असल्याच्या घटना मुंबईत दिवसेंदिवस वाढत अाहेत. 

नागरिकांच्या तक्रारींचं गांभीर्य लक्षात घेऊन अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या एका सराईत चोरट्याला साकीनाका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तपासात त्याच्याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती उघडकीस आली अाहे.

पश्चिम उपनगरात लूट

मूळचा ओडिसाच्या धाणमंडल येथील जाचपूरचा रहिवाशी असलेला शंभव कुमार आचार्य (२८) हा   अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होता. पश्चिम उपनगरात एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांचे लक्ष विचलीत करून त्यांना लुबाडण्याच्या घटना घडल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे अाल्या होत्या. साकीनाका पोलिस ठाण्यातही नुकतंच अशा फसवणूकीची तक्रार दाखल झाली होती. तपासात पोलिसांना सीसीटिव्हीत शंभवचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. शंभव हा साकीनाका परिसरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.


ओडिसात १२ गुन्हे

 चौकशीत त्याने आतापर्यंत मुंबईत अंधेरी, वर्सोवा, मालाड, सांताक्रूझ, डी.एन.नगर, जोगेश्वरी, मेघवाडी, वरळी, पवई कुर्ला या ठिकाणी अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झाल. तर अधिक चौकशीत त्याच्यावर ओडिसा राज्यातच १२ गुन्हयांची नोंद असल्याचं उघडकीस अालं.

मदतीचा बहाणा

शंभव एटीएमजवळ पैसे काढण्यास चाचपडणाऱ्या ग्राहकांना हेरत असे. त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करत असतानाच पासवर्ड बघायचा.  मात्र, देताना दुसऱ्याच व्यक्तीचे एटीएम कार्ड तो देत असे. त्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीचे कार्ड ट्रान्सफर करून विविध एटीएममधून पैसे काढत असे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून अन्य कुणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


पोलिसांचं आवाहन

  • वृद्धांनी एटीएममध्ये पैसे काढण्यास जाताना घरातील व्यक्तीला सोबत न्यावे.
  •  पिनकोड टाकताना काळजी घ्यावी.
  • अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका.
  • कार्ड वापरानंतर बंद झाल्याची खात्री करा.
  • पैसे स्वत: माेजा, दुसऱ्यांना देऊ नका. अनोळखी व्यक्ती मदत करण्याचे सांगत असल्यास पोलिसांना कळवा.



हेही वाचा - 

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; शिक्षकाला अटक

नेव्ही जवानाने पोहत जाऊन तरूणाला वाचवलं




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा