अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; शिक्षकाला अटक

कुर्ला परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहणारी मुलगी आरोपीकडे खासगी ट्युशनसाठी मागील अनेक दिवसांपासून जात होती. सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे ट्युशनला गेली असताना लुईसने संधी साधून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; शिक्षकाला अटक
SHARES

मुंबईच्या विनोबा भावे नगर परिसरातील खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने ९ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी लुईस फर्नांडिस (५४) वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.  याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


ट्युशनमधून काढण्याची धमकी

कुर्ला परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहणारी मुलगी आरोपीकडे खासगी ट्युशनसाठी मागील अनेक दिवसांपासून जात होती. सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे ट्युशनला गेली असताना लुईसने संधी साधून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्याला मुलीने विरोध केला. आपल्याकडून झालेली चूक लक्षात आल्यानंतर लुईसने तिला याबाबत कुणालाही न सांगण्यास धमकावले.  अन्यथा ट्युशनमधून काढून टाकण्याची धमकी दिली.


पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्हा 

या प्रकरणामुळे घाबरलेली मुलगी विचित्र वागत होती. त्यामुळे घरातल्यांनी तिला विश्वासात घेवून विचारपूस केल्यानंतर तिने लुईसने केलेल्या अश्लील चाळ्यांची माहिती दिली.  याप्रकरणी विनोबा भावे मार्ग पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भा.दं. वि. कलम ३५४, ५०६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्हा दाखल करत लुईसला अटक केली आहे.हेही वाचा-
नेव्ही जवानाने पोहत जाऊन तरूणाला वाचवलं

'भारत बंद' आंदोलन: ८८२ आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा