अश्लिल हावभाव करणं बीएमसी कर्मचाऱ्याला पडलं महागात


अश्लिल हावभाव करणं बीएमसी कर्मचाऱ्याला पडलं महागात
SHARES

२० वर्षीय तरुणीकडे पाहून अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. लक्ष्मण कात्रायम हरिजन (५४) असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयानं लक्ष्मणला पोलिस कोठडी सुनावली आहे.


अन् त्याने डोळा मारला

वरळीत राहणारी २० वर्षीय रितू गड्डू हिने १८ आॅगस्ट रोजी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी वरळी नाका येथून १६८ क्रमांकाची बस पकडली. रितूची बस एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील उड्डाण पूलावर वाहतूक कोंडीत अडकली असताना, तिच्या बसशेजारी पालिकेची एक गाडी थांबली. त्या गाडीत पालिकेचे सहा कर्मचारी होते. बसच्या खिडकीला बसलेल्या रितूचे सहजच गाडीकडे लक्ष गेले असता, लक्ष्मण हरिजन तिच्याकडे एकटक पाहत होता. सुरुवातीला रितूने दुर्लक्ष केले. मात्र लक्ष्मण नजर हटवतच नसल्यामुळे रितूने त्याला हटकले. त्यावेळी त्याने रितूला पाहून डोळा मारला. ऐवढ्यावरच न थांबता त्याने रितूकडे पाहून अश्लिल हावभाव करत चुंबन दिले.


'तुला काय करायचं ते कर'

राग अनावर झालेल्या रितूने पालिकेची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सिग्नल सुटल्यानं गाड्या पुढे सरकल्या. त्यावेळी रितूनं पालिकेच्या गाडीचा नंबर लिहून घेतला. पुढच्या सिग्नलवर पालिकेची गाडी उभी असताना, पुन्हा रितूने त्याला बसमधूनच जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र लक्ष्मणने 'जा तुला काय करायचं ते कर' अशी धमकी दिली.


प्रकरणाला वेगळंच वळण

रितूने भोईवाडा पोलिस ठाणे गाठल्यानंतर पोलिसांनी रितूची तक्रार ऐकून घेतली. तिने दिलेल्या तक्रारीवरून, या क्रमांकाची गाडी पोलिसांना टाटा रुग्णालयाच्या मागे अाढळली. तेथील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर लक्ष्मण पोलिसांच्या हाती लागला. मात्र हा गुन्हा दादर पोलिसांच्या हद्दीत घडल्यानं भोईवाडा पोलिसांनी गुन्हा आणि आरोपी लक्ष्मणला दादर पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकरणी न्यायालयानं लक्ष्मणला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा -

मालेगाव होतं पुन्हा टार्गेटवर

डाॅ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक

नशेसाठी त्यांनी पतपेढी लुटली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा