सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : बॉलीवूडच्या 'या" सेलेब्रिटींची होऊ शकते चौकशी

एनसीबीच्या चौकशीत रियाने सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावे पुढे आली असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : बॉलीवूडच्या 'या" सेलेब्रिटींची होऊ शकते चौकशी
SHARES

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या(एसीबी) तपासात नावं पुढे आलेल्या बॉलीवूड सेलेब्रीटींची शनिवारपासून चौकशी करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान सुशांत सिंगप्रकरणी एम्सच्या न्यायवैधक तज्ज्ञांनी केलेल्या विसेरा चाचणीचा अहवाल रविवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यात ते सुशांतच्या मृत्यूच्या कारणे सांगण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः- नुसत्या लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी २५ कोटींचा दंड वसूल केला

 रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे सॅम्युअल मिरांडा तसेच दिपेश सावंतच्या माध्यमातुन ड्रग्ज तस्करांच्या होती. त्यानुसार, एनसीबीने मुंबई आणि गोवा येथे छापे मारले होते. आतापर्यंत याप्रकरणी १८  जणांना अटक केली आहे. एनसीबीच्या चौकशीत रियाने सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा यांची नावे पुढे आली असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्याच्यापैकी कोणालाही अद्याप समन्स पाठवण्यात आलेला नाही. मात्र, शनिवारपासून त्यांच्या चौकशी सुरू करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. रियाने केवळ गांजा आणि एमडी हे ड्रग्ज सुशांतला दिले नाही तर कोकेनसारखे हाय प्रोफाईल ड्रग्ज देखील वापरल्याचे आत्तांपर्यंतच्या तपासांत समोर आले आहे. तसेच याप्रकरणी अनेक बाॅलिवूड सेलिब्रेटीजना समन्स पाठविण्यात येणार आहे. तर काही तस्कराना अटक होण्याची शक्यता असल्याचे एनसीबीने स्पष्ट केले.

हेही वाचाः- धक्कादायक घटना ! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

दरम्यान, एनसीबीच्या पथकाने सुशांत  सिंह राजपूतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा टाकला आहे. यावेळी त्यांना हुक्काची भांडी, काही औषधे, अॅश ट्रे आणि आणखी ब-याच गोष्टी सापडल्या. सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या फार्महाऊसवर पार्टी करीत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे, सुशांतच्या जवळच्या मित्रां व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीं देखील याठिकाणी पार्टी करण्यास जात होते. दरम्यान, रिया चक्रवर्ती आणि ड्रग पेडलर यांच्यांतल्या संभाषणाचा एक नवा खुलासा झाला आहे. रिया ड्रग डीलरशी बोलण्यासाठी कधीही स्वतःचा फोन वापरत नव्हती.त्यासाठी नात्यातील एका व्यक्तीच्या मोबाईल फोनचा वापर केला जायचा त्याअनुशंगाने याचा अधिक तपास सुरु असल्याचे एनसीबीने सांगितले.

संबंधित विषय