अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपीला खार पोलिसांनी अटक केली आहे. इम्तियाज अन्सारी (35) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. 6 जुलै रोजी इम्तियाज करिश्मा कपूरच्या खार येथील घरात काम करणाऱ्या महिलेची पर्स चोरून पसार झाला होता.
इम्तियाज चोऱ्या करण्यात पटाईत आहे. पण त्याचे दुसरे देखील एक रूप आहे. ते म्हणजे तो सुताराचेही काम करत होता. याच सुतारकामाच्या नावावर तो चोऱ्या करत होता आणि ते देखील उच्चभ्रू वस्तीत. श्रीमंतांच्या घरच्या लँडलाईनवर हा इम्तियाज फोन करत असे. त्यानंतर आपण एक कारपेंटर असल्याचे सांगून तुमच्या घरात काही काम करायचे आहे का? असे तो विचारत असे. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तो तिथल्या सुरक्षारक्षकाची मदत घेत असे. घरात आल्यानंतर संधी मिळताच तो घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार होत असे. अशाच प्रकारे त्याने 6 जुलै रोजी करिश्माच्या घरीही चोरी केली होती. त्यानंतर खार पोलीस त्याच्या मागावर होते. चोरी केलेले एक एटीएम कार्ड तो वापरत होता. याबाबत माहिती मिळताच खार पोलिसांनी त्याला अटक केली.
इम्तियाज अन्सारीच्या गुन्ह्यांचा पाढा चांगलाच मोठा आहे. एकट्या खार परिसरात त्याने पाच चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. खारसह वांद्रे, संताक्रूझ, जुहू, अंबोली, वर्सोवा, विलेपार्ले, अंधेरी या पोलीस ठाण्यात तब्बल 18 गुन्हे नोंद असल्याची कबुली त्याने दिली, असा दावा खार पोलिसांनी केला आहे. या व्यतिरिक्त खंडणी आणि धमकीच्या चार गुन्ह्यांत देखील त्याला अटक झाली होती.
हेही वाचा -
चोराला पकडणाऱ्या पोलिसाचा गौरव
भांडुपमध्ये रिक्षा चोरणाऱ्या रॅकेटचा अखेर पर्दाफाश
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)