लोकल आता महिलांसाठी अधिक सुरक्षित, महिलांच्या डब्यात एस्कॉर्ट्स

मध्य रेल्वेने महिलांच्या डब्यात रात्रीच्या वेळी रेल्वे पोलिस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे जवान रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महिलांच्या डब्यात तैनात असणार आहेत.

लोकल आता महिलांसाठी अधिक सुरक्षित, महिलांच्या डब्यात एस्कॉर्ट्स
SHARES

मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमुळे लोकलमध्ये खरंच महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, यावर आता मध्य रेल्वेने उपाययोजना केली आहे.


रात्रीच्या वेळी असणार एस्कॉर्ट्स

मध्य रेल्वेने महिलांच्या डब्यात रात्रीच्या वेळी रेल्वे पोलिस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे जवान रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महिलांच्या डब्यात तैनात असणार आहेत.


महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मध्य रेल्वेच्या लोकलमधून महिलांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमधून उडी मारुन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता. सीएसएमटी स्थानकावर रविवारी सकाळच्या सुमारास ही मुलगी लोकलमध्ये चढली. महिलांचा डबा असूनही एक अनोळखी इसम त्या डब्यात चढला आणि तिच्याशी जवळीक करू लागला. हा प्रकार पाहून तरूणीने चेन खेचून ट्रेन थाबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रेन न थांबल्यामुळे अखेर धावत्या ट्रेनमधून उडी मारून या तरूणीने पुढील अघटित घडण्यापासून वाचवले.

काही दिवसांनी या इसमाला अटक झाली असली, तरी या आणि अशा अनेक घटनांमुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार समोर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.


फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास डब्यात असणार एस्कॉर्ट्स

सीएसएमटीच्या दिशेकडे असणारा महिलांचा पहिला सेकंड क्लास डबा, तर सीएसएमटीकडील महिलांच्या तिसऱ्या फर्स्ट क्लास डब्यात आणि सीएसएमटीकडून सहाव्या सेकंड क्लास महिलांच्या डब्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हे जवान तैनात असणार आहेत.



हेही वाचा

धावत्या लोकलमधून मुलीची उडी, ४ दिवसानंतर आरोपी गजाआड


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा