सायबर फसवणूक रोखण्यासाठी ५ सायबर पोलिस ठाणी उद्यापासून नागरिकांच्या सेवेत


सायबर फसवणूक रोखण्यासाठी ५ सायबर पोलिस ठाणी उद्यापासून नागरिकांच्या सेवेत
SHARES

शहरातील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असतानाच त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईत काही वर्षांपूर्वी स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. याच पाच सायबर पोलिस ठाण्यांचे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधून उद्घाटन केले. त्यामुळे सायबर संबंधातील तक्रारी नोंदविण्यासाठी बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यामध्ये जाण्याची गरज राहणार नाही.

हेही वाचाः- अंडर-१८ खेळाडूंसाठी बाऊन्सरवर बंदी घालण्याची मागणी

गेली कित्येक वर्षे राजकीय वादात अडकलेले सायबर पोलीस ठाणे आज प्रत्यक्षात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत ५ नवीव सायबर पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे. सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मुंबईत पाच नवीन सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात आली आहे. या नवीन सायबर पोलीस ठाण्यांमध्ये २ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंतच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या पोलीस ठाण्यांमध्ये ५० टक्के मनुष्यबळ हे महिलांचे असणार आहे. सायबर कायद्याचे ज्ञान, गुन्हे उघडकीस आणण्यात असलेला अनुभव आणि सायबरचे प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याआधी सायबर गुन्ह्यांच्या तपासकरिता तसेच तांत्रिक मदतीसाठी पोलिसांना तसेच तक्रारदारांना गुन्हे शाखेच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सायबर पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे नवीन सायबर पोलीस स्टेशन आणि ते ही तज्ञ मनुष्य बळासह मुंबईच्या मुख्य ठिकाणी सायबर पोलीस स्टेशन असने गरजेचे होते. ते सायबर पोलीस स्टेशन आता सुरू झाले असून स्थानिक पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पोलिस ठाण्याचे कामकाज होणार आहे.

हेही वाचाः- प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चाललीय, काँग्रेसचा टोला

मुंबई पूर्व विभागात गोवंडी येथील शिवाजीनगर पोलिस ठाणे, मुंबई पश्चिम विभागात वांद्रे येथील पश्चिम प्रादेशिक विभाग कार्यालय, मुंबई उत्तर विभागात कांदिवली येथील समता नगर पोलिस ठाणे, मुंबई मध्य विभागात वरळी येथील वरळी पोलिस ठाणे आणि मुंबई दक्षिण विभागात दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाणे या ५ ठिकाणी सायबर पोलीस स्टेशन अद्यावत यंत्रणा आणि साहित्यांसह तयार करण्यात आले आहे. शिवाय कमी मनुष्य बळामुळे या सायबर पोलीस स्टेशनच्या कामकाजावर परिणाम होवू नये याकरता ५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २० पोलीस निरीक्षक, ३० सहायक पोलीस निरीक्षक, ५० पोलीस उपनिरीक्षक, २०० पोलीस कॉन्स्टेबल असं भलं मोठं मनुष्य बळ तेही सायबर प्रशिक्षण घेतलेले पोलीस या ५ सायबर पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा