SHARE

मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल रमेश चव्हाण यांच्या गाडीचा कुर्ला ब्रीज उतरताना भीषण अपघात झाला. यामध्ये रमेश चव्हाण यांना जबरदस्त दुखापत झाल्यामुळं त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र, तत्पूर्वीच त्यांच्या मृत्यू झाला होता. कसा झाला अपघात?

रमेश चव्हाण सोमवारी सकाळी ११.५५ वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिकला जात होते. यावेळी कुर्ला ब्रीज उतरताना त्यांची गाडी डिव्हायडरला धडकून पलीकडे गेली आणि समोरून येणाऱ्या व्हॅगन आर गाडीला धडकली.  व्हॅगन आर गाडीत दक्षिण भारतातील पार्थ सारथी यांंचं कुटुंबं होतं.  अपघातात या कुटुंबातील ३ जण जखमी झाले. यामध्ये १ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.  त्यांना सोमय्या रुग्णालयात दाखल केलं आहे.हेही वाचा -

गेट वे आॅफ इंडिया इथं आढळला मृतदेह

एक्स्प्रेसच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार

तरुणाची लोकलसमोर उडी टाकून आत्महत्या 

संबंधित विषय
ताज्या बातम्या