मानखुर्दच्या गतीमंद बालसुधारगृहात कोरोनाचा शिरकाव, २९ जणांना कोरोनाची लागण

या सुधारगृहात सध्या २६८ व्यक्ती आहेत. त्यातील काहींना लक्षण आढळल्यामुळे ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील २९ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मानखुर्दच्या गतीमंद बालसुधारगृहात कोरोनाचा शिरकाव, २९ जणांना कोरोनाची लागण
SHARES

समाजातील अनाथ, वंचित, गतिमंद आणि आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांसाठी मुंबईत आठ बालसुधारगृह आहेत. या पैकीच एक मानखुर्द बालसुधागृहाजवळ ही बालकल्याण नगरी. सध्या या बालसुधारगृहावर संकट आले आहे ते कोरोनाचे, मानखुर्दच्या गतीमंद बालसुधारगृहातील २९ व्यक्तींना सध्या कोरोनाची लागण झाल आहे. या शेल्टर होममधील ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे. या मुलांवर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचाः- डोंगरीच्या बालसुधारगृहात कोरोनाची ‘इंट्री’

मानखुर्द परिसरात ६५ एकर जागेत हे बालसुधारगृह वसलेले असताना शासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या या बालसुधारगृहाची मोठी दुरवस्था आहे. त्यामुळेच या सुधारगृहामधून पळून जाणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोना महामारीने बालसुधार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. मात्र तरी ही काही मुलांमध्ये ताप, खोकला अशी लक्षण आढळून येत होती. या शेल्टर होममध्ये लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध व्यक्तींनाही ठेवण्यात येते. या सुधारगृहात सध्या २६८  व्यक्ती आहेत. त्यातील काहींना लक्षण आढळल्यामुळे ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील २९ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात पाच महिलांचाही समावेश आहे. बहुतांश व्यक्तींना कोरोनाची गंभीर लक्षण नाहीत. पण काही व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब सारखे आजार आहेत.

हेही वाचाः- मुंबईत लॉकडाऊनमुळे बालसुधारगृहात अडकलेत ७५ मुले

 एकाला क्षयरोगाचाही आजार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ला घेण्यात येत आहे. तसेच कोरानासह इतर आजार असलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.या सर्वांना नेमका कोणामुळे कोरोना झाला, हे स्पष्ट झाले नसले, तरी या शेल्टर होममध्ये काम करणारे कर्मचारी व मानखुर्द बालसुधारगृहातील कर्मचारी एकाच कर्मचारी वसाहतीत राहतात. मानखुर्दच्या बालगृहामध्ये रक्षक पदावर कार्यरत असलेल्या जितेंद्र सोळंकी या कर्मचारयाचा नुकताच  कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच त्यावेळी दोन कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू होते.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा