Advertisement

डोंगरीच्या बालसुधारगृहात कोरोनाची ‘इंट्री’

लॉकडाऊनच्या काळात भोईवाडा येथे ही मुलगी एकटी फिरताना आढळली. आईच्या मृत्यूनंतर वडिल तिचा देखभाल करत नव्हते. म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव अखेर पोलिसांनी ८ जुलै रोजी तिची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात केली. तिची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली.

डोंगरीच्या बालसुधारगृहात कोरोनाची ‘इंट्री’
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना. राज्याच्या शेकडो कैद्यांपर्यंत हा संसर्गजन्य रोग पसरला. मात्र आता कोरोनाने डोंगरीच्या बाल सुधारगृहात (Juvenile Correctional Home) ही प्रवेश केला आहे. डोंगरीच्या बाल सुधार गृहातील १६ वर्षीय मुलीला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. मात्र तिच्यात आढळलेली लक्षण ही अतिसौम्य असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही तरुणीला बेड उपलब्ध व्हायला ४ दिवसांचा कालावधी लागला.  

हेही वाचाः- रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, ७ जणांना अटक

लॉकडाऊनच्या काळात भोईवाडा येथे ही मुलगी एकटी फिरताना आढळली. आईच्या मृत्यूनंतर वडिल तिचा देखभाल करत नव्हते. म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव अखेर पोलिसांनी ८ जुलै रोजी तिची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात केली.  सुधारगृहात तिला घेण्यापूर्वी तिची कोरोनाची वैद्यकिय चाचणी (Coronairus test) करण्यात आली. त्या वैद्यकिय चाचणीचा अहवाल हा ११ जुलै रोजी प्राप्त झाला. त्यात मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मुलीला कोरोनाची अतिसौम्य लक्षणे होती. अंगात कणकणी आणि घशात खवखवणे सुरू झाले होते. त्यामुळे मुलीला रुग्णालयात उपचारासाठी हालवण्यासाठी सुधारगृहातील अधिकारी प्रयत्न करत होते. मात्र या मुलीसाठी रुग्णालयात कुठेच  बेड उपलब्ध होत नव्हता. तोपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून मुलीला विलगीकरण (Isolation ) कक्षात ठेवण्यात आले होते.

हेही वाचाः- मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हे' तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता

त्यानंतर १४ जुलैला जी.टी रुग्णालयात जागा उपलब्ध झाल्यानंतर तिला भरती करण्यात आले. या मुलीची प्रकृती सध्या ठीक असल्याचे डोंगरी बालसुधारगृहाचे अधिक्षक राहुल कांठीकर यांनी सांगितले. सध्या डोंगरी ११० अल्पवयीन मुले आहेत. त्यात घरातून पळालेले, सुटका केलेले बाल कामगार, विधीसंघर्षग्रस्त मुलांचा समावेश आहे. यापूर्वी बालसुधारगृहातील ४ मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या बालसुधारगृहात मुलांना दाखल करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली जाते




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा