मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या CISF च्या 5 जवानांना कोरोनाची लागण


मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या CISF च्या 5 जवानांना कोरोनाची लागण
SHARES
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आता समोर येऊ लागले आहेत. धक्कादायकबाब म्हणजे या संसर्ग रोगाची लाग आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात  असलेल्या कर्मचाऱ्यांना होत आहे. मुंबईत तीन पोलिसांना कोरोनाची लागन झाल्याचे वृत्त ताजे असतानाच,.मुंबई विमानतळ (Mumbai Airport) येथे काम करणाऱ्या 5 CISF जवानांना COVID-19 बाधा झाल्याचे पुढे आले आहे. या पाचही जणांचे कोरोना व्हायरस चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

 हे पाचही जवान हे नवी मुंबई (Navi Mumbai) येथील पनवेल परिसरात राहणारे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोनच दिवसांपूर्वी पनवेल येथील एका सीआयएसएफ (CISF) जवानाला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जवानांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
नवी मुंबई शहरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ही संख्या पनवेल, वाशी, कोपरखैरणे आणि नेरुळ येथील असल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान, पनवेलमध्ये ज्या परीसरातील इमारतीत हे पाच सीआयएसएफ रुग्ण आढलले आहेत ती इमारत नवी मुंबई महापालिकेने बंद केली आहे. या इमारतीत राहणाऱ्या इतरही काही रहिवाशांची कोरोना व्हायरस चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. या पाच जवानांसह पनवेलमधील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या जवळपास आठवर पोहोचली आहे.

दरम्यान, वाशी येथे राहात असलेल्या एका विदेशी नागरिकास कोरोना व्हायरस झाला होता. हा नागरिक फिलिपीन्स येथून आला होता. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या काही नागरिकांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, मुंबई शहरातील वरळी पोलिस कँम्प मधील दोन पोलिस शिपायांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येथील परिसरही मुंबई महापालिकेने सील केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा