कौतुकास्पद! मास्क न घातल्याप्रकरणी सोमवारी एक ही गुन्हा नाही


कौतुकास्पद! मास्क न घातल्याप्रकरणी सोमवारी एक ही गुन्हा नाही
SHARES
मुंबईत कोरोनाचे दिवसेंदिवस नवे रुग्ण समोर येत असल्याने चिंताजनक वातावरण आहे. त्यामुळे शहरात मास्क वापरणे सक्तीचे असताना ही काही बेजबाबदार लोकांकडून मास्क घातले जात नव्हते. अशांवर पोलिसांनी थेट गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केल्यानंतर सोमवारी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. सोमवारी मुंबईत मास्क न घातल्या प्रकरणी एक ही नोंदवण्यात आलेला नाही.

हेही वाचाः- पालघर जिल्ह्यात ४० वर्षीय पोलीसाचा कोरोनामुळं मृत्यू


मुंबईत सध्या कोरोनाची दहशत असतानाच, खबरदारी म्हणून तोडांला मास्क लावा असे सांगून देखील काही बेशिस्त नागरिक मास्क न वापरता फिरायचे अशा मास्क न वापरणाऱ्यां आतापर्यंत 1240 जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या शिवाय 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी जमणे, कलम 188 चे उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 हजार 877 जणांवर गुन्हे नोंदवलेले आहेत. नागरिकांनी गरजे व्यतिरिक्त बाहेर पडू नये, पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकञ जमू नये, तसेच तोंडाला मास्क वापरणे सक्तीचे केले असताना. अनेकदा बेशिस्त नागरिक   या नियमांची पायमल्ली करताना दिसतात.


हेही वाचाः- सुशांत सिंह राजपूतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या


माञ पोलिसांनी वेळोवेळी उचललेल्या पाऊलांमुळे आता त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. ऐरवी दिवसाला  अंदाजे 10 हून अधिक गुन्हे मास्क न घालणाऱ्यांविरोधात नोंदवले जात होते. अशांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली. माञ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, कोरोना या महामारीला मुंबईकरांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच सोमवारी मास्क न घातल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एक ही गुन्हा नोंदवल्याचे त्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तर नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली, तरी पूर्णतहा लाँकडाऊन उठवलेला नाही, त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांनो सावधान, अवैध वाहतूकीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 80 हजार 532 जणांची वाहने आतापर्यंत जप्त केलेली आहेत. तर लाँकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात 1 लाख 23  हजार गुन्हे नोंदवलेले आहेत.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा