२४ तासात एकाही पोलिसाचा मृत्यू नाही

मृत पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचे सर्वाधिक म्हणजेच ८४ पोलिसांचा समावेश आहे.

२४ तासात एकाही पोलिसाचा मृत्यू नाही
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिस आही रस्त्यावर उभे आहेत. नागरिकांच्या थेट संपर्कात येत असल्यामुळे पोलिसांमध्ये कोरोनचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत एकूण २३,०३३ महाराष्ट्र पोलिस कोरोना बाधित झाले असून २४५जण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे मागील चौवीस तासात एका ही पोलिसाचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही. दरम्यान मृत पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचे सर्वाधिक म्हणजेच ८४ पोलिसांचा समावेश आहे.

हेही वाचाः-सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी अंश सापडले नाहीत, एम्सचा खुलासा

राज्यातील ग्रामीण विभागातील पोलिसांमध्ये कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू चितेंचे विषय ठरत आहे. बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांतही ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू झाले. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध तुकड्यांमध्येही ऑगस्ट महिन्यात पोलिसांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात २९ सप्टेंबर रोजीच्या अपडेटनुसार, पुन्हा २१५ नवे कोरोनाबाधित कर्मचारी आढळून आले आहेत. यानुसार राज्य पोलिस दलातील आजवरच्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या २३ हजार ०३३ इतकी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील २४तासात कोरोनामुळे एकाही पोलिस कर्मचारा‍र्‍यांचा मृत्यु  झालेला नाही. त्यामुळे कोरोनामृतांचा आकडा २४५ इतका झाला आहे. आजवर आढळलेल्या २३०३३ रुग्णांपैकी १९ हजार ६८१ रुग्णांनी आजवर या जीवघेण्या विषाणुवर मात केली आहे. तर सद्य घडीला ३ हजार १०७ कोरोनाबाधित अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी बहुतांश जणांची प्रकृती नियंत्रणात आहे.

हेही वाचाः-राज्यात लाॅकडाऊन दरम्यान २८ कोटी ५५ लाखांचा दंड वसूल

कोरोना व्हायरस सुरु होताचा सोशल डिस्टंसिंग ची सक्ती करण्यात आली होती त्यावेळेस पोलिस २४ तास कडक बंदोबस्तात गस्त घालत होते. मात्र मागील काही दिवसात अनेक प्रसंगात या अंतर राखा नियमाचा फज्जा उडत आहे. कंगना मुंबईत येण्याचा कालचा प्रकार असो वा रिया च्या चौकशी दरम्यान होणारी गर्दी प्रत्येक ठिकाणी गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांना पुढे जावे लागत असल्याने त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा