क्रिकेट असोसिएशनने थकवले मुंबई पोलिसांचे कोट्यावधी रुपये

महिला क्रिकेट विश्वचषक, टी-२० वल्डकप, आयपीएलसाठी मागवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्ताचे १४.८२ कोटी रुपये अद्याप दिले नसल्याचे माहितीच्या अधिकातून मागवलेल्या माहितीतून पुढे आले आहे.

क्रिकेट असोसिएशनने थकवले मुंबई पोलिसांचे कोट्यावधी रुपये
SHARES

मुंबईत क्रिकेट सामन्यांसाठी मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी चोख सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. या बंदोबस्तासाठी पोलिसांकडून पैसे आकारले जातात. मुंबई क्रिकेट असोसिएशन(Mumbai Cricket Association )ने खेळवलेले महिला क्रिकेट विश्वचषक, टी-२० वल्डकप, आयपीएलसाठी मागवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्ताचे १४.८२ कोटी रुपये अद्याप दिले नसल्याचे माहितीच्या अधिकातून (RTI) मागवलेल्या माहितीतून पुढे आले आहे. पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसुलीसाठी गृह विभाभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनाही पत्र लिहिले आहे.

 हेही वाचाः- गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची प्रवाशी संघटनांची मागणी

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला विविध क्रिकेट सामन्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सुरक्षा आणि आलेल्या खर्चाची माहिती मुंबई पोलिसांकडून मागवली होती. या माहितीत वर्ष २०१३ मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक (Cricket World Cup), वर्ष २०१६ चा विश्वचषक टी -२०, वर्ष २०१६ मधील कसोटी सामने, २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या ८ वर्षात केवळ २०१८ च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra)ने अद्याप आदेश जारी केलेला नाही.

हेही वाचाः- नालासोपारा स्थानकात संतप्त प्रवाशांकडून आंदोलन

याबाबत मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जानेवारीपर्यंत हे पैसे मिळण्यासाठी तब्बल ३०पत्र क्रिकेट असोसिएशनला लिहिले आहे. मात्र त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडूनन कुठलेही उत्तर आलेले नाही. याबाबत आता मुंबई पोलिसांनी (Mumbai police) गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्रही लिहिले आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना पत्र लिहून मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकबाकी न भरल्याबद्दल एफआयआर नोंदवावी आणि जिल्हाधिकार्यांकडून पैसे वसुलीसाठी कार्यवाही करत असोसिएशनची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी केली आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा