'पद्मावत'ला विरोध कायम, १७ आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात


'पद्मावत'ला विरोध कायम, १७ आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात
SHARES

पद्मावती सिनेमाचं नाव बदलून पद्मावत करण्यात आलं, सिनेमातील आक्षेपार्ह भागही वगळण्यात आले. तरीही पद्मावतला करणी सेनेचा विरोध कायम आहे. या प्रकरणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी १७ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली असली, तरी प्रत्यक्षात १०० हून अधिक कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचं म्हटलं जात आहे. 


अडथळ्यांची शर्यत पार, तरीही

सिनेमाच्या घोषणेपासून वादात अडकलेल्या 'पद्मावती' सिनेमाचं नाव बदलून 'पद्मावत' असं करण्यात आलं. सिनेमातील अाक्षेपार्ह भाग वगळण्यात आले. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर सिनेमाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा देत ही बंदी उठवत भारतभर सिनेमा रिलीज करण्याचे आदेश दिले. असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करत सिनेमा प्रदर्शित झाला खरा, पण तरीही करणी सेनेकडून सुरू असलेला विरोध कायम आहे.



कुठून झाली अटक?

गुजरातमध्ये पद्मावत सिनेमा दाखवणाऱ्या सिनेमांगृहाची काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर मुंबईत असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व सिनेमागृहांना पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावा यासाठी निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांची देखील पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. त्यानुसार निर्देशने करणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी कांदिवलीतून आणि ९ जणांना बोरिवलीतून ताब्यात घेतलं आहे.

'पद्मावत' सिनेमाला होणारा हा वाढता विरोध पाहता, या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या दीपिका पादूकोण, रणवीर सिंह, शाहीद कपूर आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांना देखील सुरक्षा पुरवणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

मुंबईत पद्मावतला 'मनसे' संरक्षण!

'पद्मावत'विरोधात सेन्साॅर बोर्डाच्या आॅफिससमोर करणी सेनेचं आंदोलन, ९६ जणांना अटक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा