डीसीपींनींच रंगेहाथ पकडलं लाचखोर पोलिसाला!

आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा धाक दाखवून लाच घेणाऱ्या या पोलिस हवालदाराला खुद्द डीसीपींनीच रंगेहात पकडल्याने कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पोलिस शिपायाची तातडीने बदली करण्यात आली असून त्याच्या विरोधात चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

डीसीपींनींच रंगेहाथ पकडलं लाचखोर पोलिसाला!
SHARES

'आयजीच्या जीवावर बायजी उदार' ही म्हण सर्वांनाच ठाऊक असेल, कतृत्ववान व्यक्तीचं नाव पुढे करायचं आणि त्याच्या नावाने मलई चाखायची ही सवय पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांच्याही अंगवळणी पडली आहे. हीच सवय एका पोलिस शिपायाला गोत्यात आणणारी ठरली. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा धाक दाखवून लाच घेणाऱ्या या पोलिस हवालदाराला खुद्द डीसीपींनीच रंगेहात पकडल्याने कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पोलिस शिपायाची तातडीने बदली करण्यात आली असून त्याच्या विरोधात चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.


वरिष्ठांचा धाक

मुंबईच्या पोर्ट झोन परिसरात सर्वाधिक तेल कंपन्या आहेत. या कंपन्यांची पाईपलाईन फोडून किंवा समुद्रमार्गे येणाऱ्या जहाजातून अधिकाऱ्यांच्या मदतीने तेल चोरी होत असते. मात्र मागील काही दिवसांपासून पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे या परिसरातील तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.


छुप्या पद्धतीने तेल तस्करी

त्यातच कुख्यात तेल तस्कर राजू पंडित याच्या अटकेनंतर तेल तस्करीत घट झाली असली, तरी काही ठिकाणी कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने हे तेल तस्कर छुप्या पद्धतीने आपला धंदा करत असल्याचं करंदीकर यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी साध्या वेशात आपल्या विभागात पाळत ठेवणं सुरू केलं.


रंगेहात अटक

दरम्यान शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे वडाळा पोलिसांनी नाकाबंदी केलेली असताना गस्तीवरील एक पोलिस शिपाई करंदीकर यांच्या नावाचा धाक दाखवून तपासणी न करताच ट्रक चालकांना जाऊ देत होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर करंदीकर यांनी एका ट्रक चालकाकडून पैसे घेताना त्यांच्याच विभागातील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शिपायाला रंगेहाथ पकडलं.

या शिपायाच्या बदलीचे आदेश देण्यात आले असून त्याच्यावर विभागीय चौकशी लावण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.



हेही वाचा-

'त्याने' चक्क पोलिसांचीच शाळा घेतली

३ नायझेरियन तस्कर जेरंबद; कोकेन, हेराॅईन हस्तगत



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा