डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तुरूंगात असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांची न्यायालयीन कोठडी २४ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच या तिन्ही केलेल्या जामीन अर्जावर १७ जून रोजी सुनावणी घेण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली
SHARES

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तुरूंगात असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांची न्यायालयीन कोठडी २४ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच या तिन्ही केलेल्या जामीन अर्जावर १७ जून रोजी सुनावणी घेण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत.  

जामीनावर सुनावणी

डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने तिघींना २४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावताच त्या ढसाढसा रडायला लागल्या. आम्ही काहीही केलेलं नाही. आम्हाला तुरूंगात राहायचं नाही. आमच्या जामीन अर्जावर लवकरात लवकर सुनावणी घेऊन आमची इथून सुटका करा, अशी न्यायालयाला विनंती करतच त्यांनी टाहो फोडला. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर १७ जून रोजी सुनावणी घेण्याचं स्पष्ट केलं. 

ठोस पुरावे नाहीत

या आत्महत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने गेल्या आठवडय़ात अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. अहवालात समितीने तिन्ही आरोपी डाॅक्टरांनी  डॉ. पायल तडवीचा यांनी छळ केल्याचा निष्कर्ष काढला आहे. परंतु या तिन्ही डॉक्टरांकडून जातीय शेरेबाजी केल्याचे ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत, असंही समितीने अहवालात स्पष्ट केलं आहे. सोबतच हे प्रकरण हाताळण्यात नायर रुग्णालयाचा स्त्रीरोग विभाग अपयशी ठरल्याचा शेराही या अहवालात मारण्यात आला आहे. 

हेही वाचा-

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: पायलनं लेखी तक्रार केलेली नाही

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपींची होणार पोलीस चौकशी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा