महिन्याभरात दुसऱ्यांदा न्हावा शेवा बंदर चर्चेत, १८ हजार ५०० किलोचे रक्तचंदन जप्त

ड्रग्ज तस्करांवर केलेल्या कारवाईला होऊन महिना उलटत नाही तोच नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर पून्हा डीआरआयने रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

महिन्याभरात दुसऱ्यांदा न्हावा शेवा बंदर चर्चेत, १८ हजार ५०० किलोचे रक्तचंदन जप्त
SHARES

नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावरून स्वातंत्र्य दिनी १ हजार कोटीचे हेराॅईन ड्रग्ज पडल्याची घटना ताजी असतानाच, डीआरआयने महसुल गुप्तवार्ता संचलनालय(डीआरआय)ने पून्हा एकदा १८ हजार ५०० किलो रक्त चंदन जप्त केले आहे. साडेसात कोटी रुपयांचे हे रक्तचंदन युनायटेड अरब अमिरातीला(यूएई) पाठवण्यात येणार होते. याप्रकरणी डीआरआयने  एका संशयीताला अटक केली आहे.

 हेही वाचाः- IPL 2020: अखेर मुंबई इंडियन्सचं ठरलं, रोहित शर्मा 'या' क्रमांकावर येणार बॅटिंगला

नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर स्वातंत्र्य दिनी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केल्यानंतर चर्चेत आले होते. त्या कारवाईत तस्करांनी हैद्राबाद मार्गे कंटेनर नवी मुंबईत उतरवला होता. त्यानंतर त्या ड्रग्जची तस्करी मुंबई सारख्या शहरांमध्ये केली जाणार  होती. या कारवाईला होऊन महिना उलटत नाही तोच नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर पून्हा डीआरआयने रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.  डीआरआयला मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारे न्हावा शेवा बंदर परिसरात सोमवारपासून शोध मोहिम राबवण्यात आली धातूच्या कोरीव वस्तू दाखवून त्या आड रक्त चंदनाची तस्करी केली जात होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना एका  कंटेनरवर संशय आल्याने त्यांनी त्या कंटेनरची झडती घेतली. त्यात १८.५ मेट्रीक टन रक्त चंदन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सात कोटी ४१ लाख रुपये आहे. गुजरातच्या मुद्रा पोर्टवरून हा कंटेनर आला होता.  याप्रकरणी तपासात एका संशयीताला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. अटक आरोपी या रॅकेटचा सक्रीय सदस्य असून आता तपासाचे तार उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचले आहेत.

 हेही वाचाः- मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश

जप्त करण्यात आलेले रक्त चंदन यूएसईतील पोर्ट जाबेल अली येथे पाठवण्यात येणार होते. तेथून ते आणखी एका ठिकाणी जाणार असल्याचा संशय असून याबाबत संशयीत आरोपीची चौकशी सुरू असल्याचे अधिका-याने सांगितले. आरोपीविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्त चंदनाला परदेशात मोठी मागणी आहे. त्याच्या तुलनेत त्याला पुरवठा नसल्यामुळे भारतातून मोठ्याप्रमाणात रक्त चंदनाची तस्करी होते. चीन, हाँगकाँग व यूएसईमध्ये रक्त चंदनाला मोठी मागणी आहे. रक्त चंदनाचा औषध तसेच सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा