मुंबईत NCB च्या पथकाचे तीन ठिकाणी छापे, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त

कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा नवाब शेख टॅक्सी चालवून हा गोरखधंदा करत होता. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवत होता.

मुंबईत NCB च्या पथकाचे तीन ठिकाणी छापे, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त
SHARES

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर बाँलीवूड विरोधात NCBने फास आवळण्यास सुरूवात केली आहे. नुकतीच NCB ने एका कारवाईत प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limabchiya) यांना अटक केली होती. या ड्रग प्रकरणात (Drug Case) कोर्टानं जामीन दिला आहे. मात्र, त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः- 26/11 Attack : कसाबविरोधात साक्ष देणाऱ्या 'तिला' न्याय कधी मिळणार?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( Narcotics Control Bureau) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. NCB नं एका ड्रग्स पॅडलरला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा ड्रग्स पॅडलर कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला गांजा सप्लाय करत होता, अशी माहिती समोर आली आहे. NCBच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अटकेतील ड्रग पॅडलरची कसून चौकशी सुरू आहे. छोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येण्याची शक्यता आहे. बॉलीवूड कनेक्शनही तपासण्यात येत आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स पॅडलरकडून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ड्रग पॅडलर हा प्रत्येक सप्लिमेंटमधील ड्रग्स सप्लाय करतो. तसेच तो पेटीएम, गूगल पेच्या माध्यमातून पेमेंट घेतो. त्यामुळे त्याचे बँक अकॉउंट ट्रान्झेक्शन देखील तपासण्यात येत आहे.

हेही वाचाः- 26/11 Attack : मुंबई हल्ल्यांनंतर समुपदेशकांचे महत्त्व कळाले

दुसरीकडे, NCBकी टीमनं नवाब शेख आणि फारुख चौधरी अशा दोन २ ड्रग्स पॅडलर्ससा अटक केली आहे. दोघांकडून ३२.९ ग्रॅम एमडी ड्रग्स आणि एलएसडीच्या १० बॉट्स जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे नवाब शेख हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. तो मुंबईत टॅक्सी चालवतो. मुंबई सेंट्रलमधील 'नाथानी हाईट्स' नामक एका आलीशान अपार्टमेंटमध्ये त्याचा फ्लॅट आहे. NCB सूत्रांनुसार, कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा नवाब शेख टॅक्सी चालवून हा गोरखधंदा करत होता. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवत होता. NCB च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री उशीरा त्या घरावर छापा टाकला. तर फारुख चौधरी हा एमडी कन्साइनमेंट डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. त्यालाही अटक करण्यात आली. दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा