जीवानाश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी दुकानदारांना ‘पास’


जीवानाश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी दुकानदारांना ‘पास’
SHARES

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लाॅकडाऊन सुरू असताना नागरिकांनी जीवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांबाहेर गर्दी केली आहे.मात्र ही परवानगी सर्रासपणे न देता, त्याचे मर्यादीत पास तयार करीत ते विभागात देण्याचे आदेश दिले असल्याने, हे पास अनेक किराना दुकानदार तसेच औषध दुकानदाराना न मिळाल्याने, त्यांनी पोलिसांकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.

संपूर्ण जगात कोरनाच्या संसर्गाने थैमान घातले असुन, याचा अधिक संसर्ग होऊ नये, म्हणून देशात लाकडाऊन घोषीत केला आहे. मात्रजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच त्याच्या खरेदी-विक्रीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.राज्यात आत्तापयरात 126 कोरोनाचे रुग्ण सापडले असले तरी यातील आनदांची बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या15जणाना ड़िस्जार्ज देण्यात आला आहे. मात्रा त्यातुनही कोरोनाचे नविन रुग्न सापडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. मात्र हे सर्व करीत असताना नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक परिमंडळ मध्ये पोलीस उपायुक्तांच्या सही-शिक्याने याचे वाटप सुरु आहे. मात्र हे पासेस मर्यादीत असल्याने, ते काहीना मिळाले आहेत. तर काहीना मिळाले नाहीत.

 हेही वाचाः- राणेंनी मागितली संजय राऊतांची माफी?

यामुळे ज्यांच्याकडे असे परवाना पासेस असतील त्यांनाच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री करता येणे शक्य आहे. मात्र ज्या किराणा दुकानदारानी त्यांच्या दुकानात अत्यावश्यक वस्तू भरल्या आहेत. त्या तशाच पडुन राहील्याने, या काळात त्यांचे नुकसान होऊ लागले आहे.  यामुळे या किराणा दुकानदार मालक तसेच मेडीकल दुकानदारानी याच्या तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पोलिसांनी या वस्तू खरेदी अथवा विक्री करताना गर्दी होणार नाही याची दक्षता पोलिसांनी ज्यांना परवाना ‘पासे’स दिले आहेत, त्याना घेण्यास सांगितले आहे.  

हेही वाचाः- लाॅकडाऊन असताना ही घराबाहेर पडल्याचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा