खवय्यांनो सावधान! सटरफटर ‘बनावट बटर’ मुंबईत विक्रीला

संधी साधून काही भामट्यांनी बनावट बटर नामकिंत ब्रॅण्डच्या नावाने खपवण्याचा उद्योग सुरू केला खरा, मात्र त्यांचा हाच उद्योग आता त्यांच्या अंगलट आला

खवय्यांनो सावधान! सटरफटर ‘बनावट बटर’ मुंबईत विक्रीला
SHARES

पावभाजी मे एक्स्ट्रा बटर डालो, पराठा लाओ डब्बल बटर मारके, चहासोबत बटर दे रे, असा आवाज ऐरवी दुकानात ऐकू येतात. मात्र सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे अनेकांनी घरातच हे बेत आखले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या बटरला बाजारात मोठी मागणी आहे. हिच संधी साधून काही भामट्यांनी बनावट बटर नामकिंत ब्रॅण्डच्या नावाने खपवण्याचा उद्योग सुरू केला खरा, मात्र त्यांचा हाच उद्योग आता त्यांच्या अंगलट आला आहे. गुन्हे शाखा ८ च्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचाः- आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल- संजय राऊत

फास्टफूड जमान्यात बटर, चीज सारख्यापदार्थांची मागणी वाढली आहे. या पदार्थांना चांगला उठाव असल्याने वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी बनावट बटर विक्रीला आणले होते. मात्र वेळीच या गोष्टीची माहिती गुन्हे शाखा ८ च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वांद्रे पूर्व परिसरात पोलिसांनी पाळत ठेवून  बनावट बटरने भरलेली गाडी पोलिसांनी पकडली. पोलिसांच्या झडतीत त्यांच्या गाडीतून तब्बल ८ लाख ५२ हजार रुपयांचे बनावट बटर हस्तगत केले आहेत. या आरोपींनी अमूल या नामकिंत कंपनीच्या नावाने हे बटर विक्रीसाठी आणल्याचे तपासात पुढे आले आहे. गौतम शर्मा, संदेश नावंदर अशी या दोघांची नावे आहेत.

हेही वाचाः- Mumbai Rains: घराबाहेर पडू नका! मुंबईकरांसाठी पोलिसांचा अलर्ट

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या सीएसटी परिसरातील प्रसिद्ध कॅनन या पावभाजी सेंटर दुकानात काही दिवसांपूर्वी १०० किलो बटर आणि चीज चोरीला गेल्याची तक्रार आझाद मैदान पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अखेर संतोष थापा(२०) व करण जाधव(२५) या दोघांना अटक केली आहे. लॉकडाऊनमुळे हातचे काम सुटले जेवणाचे वांदे असल्यामुळे या दोघांनी ही चोरी केल्याची कबूली या दोघांनी पोलिसांना दिली

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा