कोरोनाचा बनावट अहवाल ५०० रुपयात, भिवंडीत पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश

भिवंडीतील शांतीनगर गैबीनगर परिसरात लोकांची कोरोना आरटीपीसीआर तपासणी न करता ५०० रुपयांमध्ये पोझिटिव्ह व निगेटिव्ह अहवाल दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कोरोनाचा बनावट अहवाल ५०० रुपयात, भिवंडीत पॅथॉलॉजी लॅबचा पर्दापाश
SHARES

अवघ्या ५०० रुपयात कोरोनाचे बनावट अहवाल विकणाऱ्या भिवंडीतील पॅथेलॉजी लॅबचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पॅथेलॉजी लॅबच्या मालकासह  चौघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. 

इनामुलहक उर्फ रब्बनी अनवारूल हक सैयद (३१ , रा. भिवंडी ) अफताब आलम मुजीबुल्ला खान ( २२, रा. पिराणीपाडा ) व मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख ( २०, रा. शांतीनगर), मेहफुज आलम मुजीबुल्ला खान ( २९, रा. भिवंडी ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

भिवंडीतील शांतीनगर गैबीनगर परिसरात लोकांची कोरोना आरटीपीसीआर तपासणी न करता ५०० रुपयांमध्ये पोझिटिव्ह व निगेटिव्ह अहवाल दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार  पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास महेफुज पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरी येथे डमी व्यक्तीला कोरोनाचे निगेटीव्ह रिपोर्ट घेण्यासाठी पाठवले. त्यावेळी आरटीपीसीआर तपासणी साठी स्वॅब अथवा सॅम्पल न घेता निगेटीव्ह रिपोर्ट थायरोकेअर या नामांकित लॅबच्या लेटरहेडचा वापर करून देताना महेफुज क्लिनीकल लॅबरॉटरी मधील तीन व्यक्तींना रंगेहात पकडले.

यावेळी महेफुज क्लिनीकल लॅबरॉटरीची झडती घेतली असता आरटीपीसीआर तपासणी केलेल्या वेगवेगळ्या  ६४  व्यक्तींचे रिपोर्ट मिळाले आहेत. त्यामध्ये ५९ रिपोर्ट हे निगेटीव्ह व ५ रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. या प्रकरणी लॅब टेक्नीशियन इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम पाहणारा आफताब आलम मुजीबुल्ला खानकडे विचारपूस केली. त्यावेळी  आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट हे लॅबमध्ये मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटरच्या सहाय्याने तयार केले असल्याची कबुली दिली.

परराज्यामध्ये जाण्यासाठी कामगारांना कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट हा निगेटीव्ह असणे बंधनकारक आहे.  यापुर्वी देखील अनेक लोकांना बनावट रिपोर्ट बनवुन दिलेले आहेत. हे सर्व रिपोर्ट हे मेहफुज क्लिनिकल लॅबरोटरीचे मालक मेहफुज आलम मुजीबुल्ला खान याच्या सांगण्यानुसार तयार करुन दिले असल्याची कबुली दिली आहे. 



हेही वाचा 

  1. विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, १३ जणांचा मृत्यू

  1. 'ऑक्सिजन' एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा