भाजी घ्याऽऽऽ भाजी, ताजी ताजी...

माटुंगा -  हिरव्या मिरच्या, लाल लाल गाजर आणि फ्रेश भाज्या. हा आठवडी बाजार भरलाय मुंबईच्या माटुंग्यामध्ये. ग्राहकांना ताज्या, ताज्या भाज्या मिळाव्यात म्हणून भाजपा सरकारने आठवडी बाजार ही संकल्पना अस्तित्वात आणली. काही ठिकाणी अशा आठवडी बाजारांचा फज्जा उडालाय. मात्र माटुंग्यात स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन प्रा. लिमिटेड आणि भाजपाच्या सहयोगाने भरवलेला हा आठवडी बाजार याला अपवाद ठरलाय.

ताज्या भाज्या विकत घेण्यासाठी ग्राहकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळतोय आणि ग्राहकांचा हाच प्रतिसाद पाहून शेतकरी राजाही खूश आहे. विशेष म्हणजे ताज्याभाज्यांसोबत महिलांनी बनवलेल्या मसाले, पापड, लोणच्यालाही ग्राहक पसंती देतायेत.

माटुंग्यामध्ये भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारांना जसा लोकांचा पाठिंबा मिळतोय तसाच पाठिंबा इतर ठिकाणी मिळाला तर शेतकरी राजाला अच्छे दिने येणार यात शंका नाही.

Loading Comments