फारुख देवडीवालाची पाकिस्तानात हत्या?

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची गुरुवारी रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्य़ातील हरिनगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येपाठोपाठ देवडीवाला यालाही संपविण्यात आल्याचं वृत्त आल्यामुळे दहशतवाद्यांविरोधात गुप्त मोहिम तर राबविली जात नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फारुख देवडीवालाची पाकिस्तानात हत्या?
SHARES

डाॅन दाऊद इब्राहीमचा विश्वासू हस्तक फारूख देवाडीवाला याचा मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. फारूखच्या हत्येनंतर मुंबईतील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून या हत्येमागे कुणाचा हात आहे याचा पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘इंटर सर्विस इंटेलिजन्स’ (आयएसआय) यावर लक्ष ठेवून अाहे.


गुप्त मोहीम ?

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची गुरुवारी रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्य़ातील हरिनगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आलम याच्यावर दोन दुचाक्यांवरून आलेल्या चौघांनी बेछूट गोळीबार केला. या दुचाक्यांची नंबरप्लेट भारतीय असल्याचं समजतं. या हत्येपाठोपाठ देवडीवाला यालाही संपविण्यात आल्याचं वृत्त आल्यामुळे दहशतवाद्यांविरोधात गुप्त मोहिम तर राबविली जात नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारवायांसाठी तरूणांची भरती

 मुंबईतील तरूणांना दुबईत नोकरीचं आमीष दाखवून भारताविरोधात घातपाती कारवायांसाठी तो त्यांना भरती करत असल्याचं नुकतंच पुढं आलं होतं. या प्रकरणात फारूख देवाडीवाला याचा मुख्य हात असल्याचं त्यावेळी उघडकीस आल्यानंतर मे मध्ये दुबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. भारतात दहशतवादी कारवाई करण्यासंदर्भात मुंबईतील फैजल मिर्झा व गुजरातमधील अल्लारख्खा खान यांना देवडीवालाने शारजामध्ये बोलावलं होतं. पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन ते भारतात परतल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना त्यांची माहिती मिळाली. त्यानंतर त्या दोघांनाही महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. या घडामोडींनंतर गेल्या आठवड्यात त्याची हत्या झाल्याचं समोर येत आहे. 



हेही वाचा - 

अखेर 'त्या' सिरियल रेपिस्टला अटक

दुकानात मोबाइल चोरणाऱ्या इराणी महिलेला दोघांसहीत अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा