अ‍ॅमेझॉनविरोधात गुन्हा दाखल, FDA ची कारवाई

मुंबईच्या वांद्रेत अमेझॉनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅमेझॉनविरोधात गुन्हा दाखल, FDA ची कारवाई
SHARES

मुंबईच्या वांद्रेत अमेझॉनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री केल्याचं उघड झाल्यानं अन्न आणि औषध प्रशासनानी (FDA) कारवाई केली आहे.

गर्भपात करण्यासाठीची औषधांची ऑनलाईन पोर्टलवर विना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय म्हणजेच प्रीस्क्रिपशनशिवाय सर्रास विक्री होत असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षणात आलं. यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं अ‍ॅमेझॉनवर गर्भपात करण्यासाठीची औषधे ऑनलाईन मागवली. यानंतर ही औषधे कुरिअरद्वारे उपलब्ध झाली. यानंतर अन्न आणि प्रशासनाने अ‍ॅमेझॉन विरोधात गुन्ह्याची नोंद केली.

गर्भपात करण्यासाठीची औषधांची किट (MTP Kit) विकण्यासाठी विक्रेत्यांना त्याचे प्लॅटफॉर्म वापरण्याची जाहिरात आणि परवानगी देण्यासाठी औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

'ए केअर'( A care) या ब्रँडच्या नावाच्या कंपनीकडून अ‍ॅमेझॉन गर्भपात करण्यासाठीची औषधाची म्हणजेच एमटीपी किटची (MTP Kit) विक्री सुरू होती. गुप्तचर अधिकार्‍यांनी कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन न देता ग्राहक असल्याचे भासवत या एमटीपी किटची ऑर्डर दिली.

विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-कॉमर्स पोर्टल अ‍ॅमेझॉनवर एमटीपी किट विक्रीचा केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली.

एफडीएने दावा केला आहे की, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा २००२ आणि नियम २००३ नुसार, एमटीपी किट कोणत्याही नियुक्त आरोग्य सुविधेवर किंवा नोंदणीकृत व्यक्तीच्या देखरेखीबाहेर न घेतल्यास ग्राहकाच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी धोकादायक ठरू शकते. औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे विना प्रीस्क्रिपशन शिवाय विक्री करण्यास मनाई आहे.



हेही वाचा

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

मुंबई पोलीस सतर्क, दंगल झाल्यास पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा