भेसळयुक्त दूध विकणाऱ्या टोळीला अटक, १८० लिटर भेसळ दूध हस्तगत

बुधवारी पहाटे दोन्ही ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी या चौघांना भेसळ करताना पकडले आहे.

भेसळयुक्त दूध विकणाऱ्या टोळीला अटक, १८० लिटर भेसळ दूध हस्तगत
SHARES

भेसळयुक्त दूध विकणाऱ्या चौघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं गोरेगाव आणि सांताक्रूझ इथून अटक केली. ही टोळी नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या फोडून, त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून विकायचे.

बुधवारी पहाटे दोन्ही ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी या चौघांना भेसळ करताना पकडले आहे. त्यांच्याकडून सुमारे ३०० लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतलं.

सांताक्रूझच्या जांभळीपाडा परिसरात एका घरामध्ये अमूल, महानंद, अन्नपूर्णा यांसारख्या नामांकित कंपनीच्या दुधामध्ये भेसळ केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत युनिट ९च्या पथकानं पहाटेच्या सुमारास या चाळीवर छापा टाकला.

एक तरुण पिशव्या फोडून त्यामध्ये पाणी मिसळताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील १८० लिटर भेसळ दूध हस्तगत करून ते टाकून दिले. त्याच्याकडून भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य, अमूल ताजा, अमूल गोल्ड दुधाच्या रिकाम्या पिशव्या हस्तगत करण्यात आल्या. भेसळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पुढील कारवाईसाठी वाकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यापूर्वी देखील अशाच एका टोळीला अटक करण्यात आले होते. प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकानं मालाड आणि गोरेगाव या दोन ठिकाणी छापे टाकले. वापरलेल्या रिकाम्या पिशव्यांमध्ये दूध भरून त्यामध्ये पाणी मिसळताना काही जण आढळले.

अमूल ताजा, गोकुळ सात्विक, अमूल गोल्ड या कंपनीच्या दुधाच्या पिशव्या फोडून भेसळ करण्यात आलेले सव्वाशे लिटर दूध पोलिसांनी हस्तगत केले. या दोन्ही प्रकरणात मालाड आणि गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही भेसळ करताना एक लिटरच्या पिशवीमधून जवळपास निम्मे दूध काढून त्यामध्ये ड्रममधील आणि अस्वच्छ टाक्यांमध्ये भरलेले पाणी मिसळले जात होते. याप्रकारे एक लिटर दुधातून दोन लिटर भेसळयुक्त दूध तयार केलं जात होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



हेही वाचा

केक आणि पेस्ट्रीजमधून ड्रग्सची विक्री, एनसीबीचा बेकरीवर छापा

रिक्षातील महिलेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावला, महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा