जालन्याच्या तरुणीवर मुंबईत सामुहिक बलात्कार

मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी आली होती. त्यावेळी पार्टी संपल्यानंतर पीडित तरुणी घरी निघाली होती. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी तरुणीला गाठत तिच्यावर अत्याचार केले. तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले जाते.

जालन्याच्या तरुणीवर मुंबईत सामुहिक बलात्कार
SHARES

जालन्यातील १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मुंबईत आलेल्या तरुणीवर चौघांनी गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आलेल्या तरुणीनं याबाबत कुणाकडेही वाच्यता न करता थेट औरंगाबाद गाठलं. या प्रकरणी चुन्नाभट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


अनोळखी व्यक्तींचं कृत्य

मूळची जालन्याची असलेली तरुणी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी आली होती. पार्टी संपल्यानंतर पीडित तरुणी घरी निघाली होती. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी तरुणीला गाठत तिच्यावर अत्याचार केले. तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं जातं. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर घाबरलेल्या तरुणीने थेट औरंगाबाद येथील नातेवाईकांचं घर गाठलं. तेथे ती चक्कर येऊन पडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डाॅक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झालं असल्याचे सांगितलं. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी जालना येथील पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. मात्र गुन्हा घडलेले ठिकाण हे मुंबईच्या चुन्नाभट्टी परिसरातील असल्यामुळे हा गुन्हा मुंबईच्या चुन्नाभट्टी पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. या प्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी चार अनोळखी आरोपींवर गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध सुरू आहेहेही वाचा -

पोलिस ठाण्यात गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा, पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

लोखंडी राॅड कारवर पडला, फॅशन डिझाईनर महिला थोडक्यात बचावली
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा