सालेमच्या लग्नाच्या मनसुब्यावर फेरलं पाणी!

मीडियात आलेल्या फोटोमुळे 'तिचं' नाव माझ्यासोबत जोडलं गेलं. यामुळे तिची खूप बदनामी झाल्याने आपल्याला तिच्यासोबत लग्न करावं लागेल. म्हणून या लग्नासाठी ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात यावा, अशा स्वरूपाचा अर्ज त्याने केला होता. मात्र तळोजा कारागृह प्रशासनाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.

SHARE

लग्नासाठी ४५ दिवस सुट्टी मिळावी म्हणून गँगस्टर अबू सालेम याने केलेला पॅरोलचा अर्ज शनिवारी नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी फेटाळला. यामुळे सालेमच्या दुसऱ्या लग्नाच्या मनसुब्यावर पाणी फेरलं आहे.


काय आहे प्रकरण?

मुंबईतील १९९३ साखळी बाॅम्बस्फोट खटल्यातील दोषी सालेमला टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे तो सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. पोर्तुगालहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलेल्या सालेमवर देशातील अनेक राज्यात गंभीर स्वरुपाचे खटले सुरू आहेत, त्यामुळे त्याला बऱ्याचदा दुसऱ्या राज्यांतील न्यायालयात रेल्वेने नेलं जातं.


धावत्या ट्रेनमध्ये लग्न

याचप्रकारे २०१४ मध्ये सालेमला राज्याबाहेर नेण्यात आलेलं असताना त्याने मुब्य्रातील कौसर नावाच्या तरूणीसोबत धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते.


मीडियामुळे बदनामी

पण तिच्यासोबत आपला विवाह झालेलाच नव्हता. मीडियात आलेल्या फोटोमुळे तिचं नाव माझ्यासोबत जोडलं गेलं. यामुळे तिची खूप बदनामी झाल्याने आपल्याला तिच्यासोबत लग्न करावं लागेल. म्हणून या लग्नासाठी ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात यावा, अशा स्वरूपाचा अर्ज त्याने केला होता. मात्र तळोजा कारागृह प्रशासनाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.हेही वाचा-

अबू सालेमला का नाही झाली फाशी?

दाऊदच्या मुंबईतील साम्राज्याला जबरदस्त हादरा!संबंधित विषय
ताज्या बातम्या