खटल्यातील साक्ष बदलण्यासाठी ‘हा’ गॅगस्टर तुरुंगातून देत होता धमकी


खटल्यातील साक्ष बदलण्यासाठी ‘हा’ गॅगस्टर तुरुंगातून देत होता धमकी
SHARES

सध्या मुंबईत पोलिसांसमोर कोणत्याही टोळीचा दबदबा नसल्याचा दावा केला जात होता. नामकिंत सर्व गुंड जरी तुरुंगात असले. तरी तुरुंगातून ते आपली सूत्र हलवून मुंबईत आपला दबदबा ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायकबाब एटीएसने केलेल्या एका कारवाईतून पुढे आली आहे. मटका किंग सुरेश भगत याची हत्या केलेल्या गँगस्टर हरीष मांडवीकर गँगच्या दोन आरोपींनी तुरुंगातून साक्षीदारास  धमकवल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचाः-मुंबईत केईएम, शीव, कूपर, नायरसह ८ ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रे

जून २०१५ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १५५ कि.ग्रॅ. कच्चा व तयार मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला होता. या कारवाईमध्ये प्रमुख आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला याच्यासह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला हा सन २००५ पासून मुंबई मध्यवर्ती कारागृह, ऑर्थर रोड येथे कैद असून अनेक प्रयत्न करूनही त्यास अद्याप जामिन मिळालेला नाही. या गुन्ह्यासंदर्भातील खटल्याची सुनावणी ही विशेष एन.डी.पी.एस. न्यायालय, मुंबई येथे सुरू असून एटीएसच्या चारकोप युनिट हे या खटल्यामध्ये लक्ष तपास करत आहे. याच दरम्यान कोरोनाचे संकट मुंबईवर ओढवल्याने या गुन्ह्यांचा तपास हा लांबला आहे. या खटल्यात कांदिवलीतील एका व्यक्तीची साक्ष ही महत्वाची माणली जात आहे. अशातच खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू झाल्यावर त्या साक्षीदाराला  २६ नोव्हेंबरला साक्ष देण्यासाठी बोलावले होते. मात्र  एक आठवडा अगोदरच आरोपींना ओळखणारा साक्षीदाराला मांडवीकर गँगचा आरोपी सुजित पडवळकर याने साक्षीदारास सुनावणीत खोटी साक्ष दयावी म्हणुन धमकावले. सुधीर हा आरोपी साक्षीदाराच्या परिचयाचा असल्याने त्याने सुरूवातीला त्याच्या धमकीकडे  दुर्लक्ष केले, परंतु त्याचे धमकावणे सलग चार-पाच दिवस सुरूच राहिल्याने साक्षीदारने चारकोपच्या एटीएसपथकात धाव घेतली.

हेही वाचाः-मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार - भाई जगताप

या तक्रारीची माहिती मिळताच एटीएसच्या पोलिसांनी आरोपी सुजित पडवळकर विरुध्द कलम १९५(अ), ३४ भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक कली आहे. आरोपी सुजित पडवळकर याने हे कृत्य गँगस्टर हरीष मांडवीकर याचा हस्तक सचिन कोळेकर उर्फ पिंटू याच्या सांगण्यावरून केला असल्याची कबुली दिली. त्यानुसार  पोलिसांनी आरोपी सचिन कोळेकर याच्या सहभागाबाबत पुरावे प्राप्त करून त्यालाही या गुन्हयात अटक केली आहे.  आरोपी सचिन कोळेकर याने  हा गुन्हा गँगस्टर हरिष रामा मांडवीकर उर्फ गणिगा याच्या सांगण्यावरून केल्याचे पोलिस तापासात निष्पन्न झाले आहे.  गँगस्टर हरीष मांडवीकर याच्याविरुध्द खुनाच्या दोन गुन्हयांसह एकूण १३ गुन्हे दाखल असून त्यातील एका गुन्हयात (मटकाकिंग सुरेश भगत खून खटला) त्यास आजन्म कारावासाची शिक्षा लागलेली आहे. हरीष हा सध्या ऑर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत असून कारागृहाच्या आतूनच त्याने त्याचा हस्तक सचिन कोळेकर उर्फ पिंटूच्या नावाने हस्तलिखित चिठ्ठीपाठवून आरोपी सचिन कोळेकर यास आरोपी सुजित पडवळकर याचेशी संगणमत करून हा गुन्हा करण्याचे आदेश दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचाः-ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी

तपासात असे समोर आले की,  गँगस्टर हरीष मांडवीकर व आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला हे दोघेही मुंबई मध्यवर्ती कारागृह, ऑर्थर रोड येथे कैद आहेत. त्या दोघांनी आधी साक्षीदार यांना धमकाविण्याबाबत कट रचला व त्या कटास अनुसरून गँगस्टर हरीष मांडवीकर याने कारागृहातून आरोपी सचिन कोळेकर याचे नावचिठ्ठी लिहून ती मध्यस्थांमार्फत आरोपी सचिन कोळेकर याच्यापर्यंत पोहचविली होती. या चिठ्ठया तोत्याची पत्नी हेमलता मांडवीकर व त्याच्या गोरेगाव-मालाड-कांदिवली-बोरीवली परिसरातील हस्तकांसाठी पाठवत असे. त्या चिठ्ठयांमधील मजकुरानुसार त्याची पत्नी त्यास दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृहात पाठवत असे व आरोपी सचिन कोळेकर उर्फ पिंटू आणि त्याचे इतर हस्तक हे गँगस्टर हरीष मांडवीकर याची इतर कामे करत असत.त्यानुसार आरोपी सचिनकोळेकर याने आरोपी सुजित पडवळकर याचे मार्फत साक्षीदारस धमकाविल्याने हा गुऱ्हा दाखल झालेला आहे. तपासात गँगस्टर हरीष मांडवीकर व आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला यांच्याविरुध्द प्राप्त झालेल्यापुराव्यांच्या आधारे सदर गुन्हयात कलम १२०(ब), ५०६ भा.दं.वि. या कलमांचा अंतर्भाव करण्यात आला असूनदहशतवाद विरोधी पथकाने गँगस्टर हरीष मांडवीकर व आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला यांचा ऑर्थर रोड कारागृह येथून ताबा घेवून त्यांना अटक केली आहे. गँगस्टर हरीष मांडवीकर हा कारागृहातुन हस्तलिखित चिठ्ठया कारागृहाबाहेर नेमक्या कशा पाठवत होता,याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा