मुंबई विमानतळावर पुन्हा सापडलं सोनं


मुंबई विमानतळावर पुन्हा सापडलं सोनं
SHARES

मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळावरून सोने पकडले जाण्याचे सत्र सुरुच आहे. एकट्या रविवारी मुंबई विमानतळावरून 92 लाखांचे सोने जप्त झाले आहे. या प्रकरणी हवाई गुप्तचर विभागाने आफ्रिकेच्या फिजी शहरातील नागरिकांसह दोघांना अटक केली आहे.

रविवारी भल्या पहाटे फिजीचा नागरिक असलेला किशोर खेरा (34) हा दागिन्यांचा व्यापारी आहे. तो आफ्रिकेच्या फिजीवरून मुंबईला आला होता. तेव्हा हवाई गुप्तचर विभागाने त्याच्या सामानाची पाहणी केली असता त्याच्या बॅगेत 1 किलो वजनाचे दागिने सापडले. या दागिन्यांची किंमत 31 लाखांच्या घरात आहे.


'सोन्याच्या विटा लपवल्या बुटात'

रविवारी कोलकात्यावरून मुंबईला आलेल्या शाहिद इकबाल (26) कडून हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1 किलो 74 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या विटा जप्त केल्या. विशेष म्हणजे कस्टमची नजर चुकवण्यासाठी या इकबालने या सोन्याच्या विटा आपल्या बुटात लपवल्या होत्या. एका इसमाने तब्बल 31 लाखांचे सोने बँकॉक विमानाच्या पेसेंजर सीटमध्ये लपवून कोलकत्याला आणले आणि त्यानंतर हे सोन इकबालने त्याच्या बुटात लपावल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शाहिद इकबाल हा कोलकात्याचा नागरिक असून अल-हयात नावाचे रेस्टॉरंट चालवतो.

आपल्या तिसऱ्या कारवाईत सोन्याची तस्करी केल्याबद्दल हवाई गुप्तचर विभागाने एका खासगी काँट्रॅक्टरलादेखील सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. दीपेश काशियानी (33) असे या खासगी काँट्रॅक्टरचे नाव असून 29 लाखांच्या सोन्यासह हवाई गुप्तचर विभागाने पकडले आहे. बँकॉकवरून आलेल्या दीपेशच्या बॅगेत भगवान बुद्धाची मूर्ती सापडली. या मूर्तीचे वजन खूपच जास्त असल्यामुळे अधिकाऱ्यांचा संशय बळावला आणि कसून तपासणी केल्यावर त्यांना सोन्याचे दोन तुकडे आढळले. तब्बल किलोभर वजनाचे हे सोने बँकॉकच्या एका व्यक्तीने आपल्याला दिले असून ते विमानतळाबाहेरील एका इसमाला द्यायचे असल्याचे या दीपेशने कबूल केल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.हेही वाचा -

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ की सोन्याची खाण?

अबब 1 कोटी 85 लाखांचं सोनं जप्त


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा