लोकलमध्ये गुंडगिरी करणारे ५ जण गजाआड, पत्रकाराला केली होती मारहाण

बुधवारी सकाळी चर्चगेट गाडीत एका हिंदी वृत्त वाहिनीचे पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या वेळी जमावाने त्यांना धावत्या लोकलमधून फेकण्याचा देखील प्रयत्न केला होता.

लोकलमध्ये गुंडगिरी करणारे ५ जण गजाआड, पत्रकाराला केली होती मारहाण
SHARES

पत्रकाराला मारहाण करत त्याला धावत्या लोकल ट्रेनमधून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळक्याला अखेर जीआरपीने अटक केली आहे. या प्रकरणी नालासोपाऱ्याला राहणाऱ्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी चर्चगेट गाडीत एका हिंदी वृत्त वाहिनीचे पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या वेळी जमावाने त्यांना धावत्या लोकलमधून फेकण्याचा देखील प्रयत्न केला होता.


कुणाला झाली अटक?

या प्रकरणी जीआरपीने विशाल डोंगरे (२८), विवेक धुमाळ (३२), रवींद्र राणावडे (२८), संजय आंबावले (३२), राजेश गोठले (२८) नावाच्या ५ जणांना अटक केली आहे.



काय आहे प्रकार?

बुधवारी सकाळी वरिष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला अंधेरीला जाण्यासाठी मिरारोडहून गाडी पकडत असताना दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या घोळक्याने त्यांना गाडीत चढण्यास मज्जाव केला. तरी सुधीर शुक्ला आणि इतर काही प्रवासी कसेबसे गाडीत चढले. गाडी मिरारोडहून सुटल्यावर देखील घोळक्याची अरेरावी सुरूच होती. त्यांनी शुक्ला आणि इतरांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.


बेदम मारहाण

प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं पाहिल्यानंतर शुक्ला यांनी इतर प्रवाशांना धक्काबुक्की करत असलेल्या घोळक्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्याची कुणकुण या गुंडांना लागली आणि त्यांनी शुक्ला यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांच्या डोक्यातून रक्त आल्यानंतर हे गुंड थांबले आणि त्यानंतर त्यांची कॉलर पकडून त्यांना दरवाज्याजवळ लटकवण्यात आलं. सुदैवाने शुक्ला यांनी खांबाला घट्ट पकडलं असल्याने ते ट्रेनमधून खाली पडले नाहीत.



हेही वाचा-

धक्कादायक! पत्रकाराला धावत्या लोकलमधून खाली फेकण्याचा प्रयत्न

धक्कादायक! रेल्वे स्टेशनवर विकृताकडून तरुणीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा