घाटकोपरमध्ये अमली पदार्थांचा साठा जप्त


घाटकोपरमध्ये अमली पदार्थांचा साठा जप्त
SHARES

मुंबईत एकीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. पण याच कालावधीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेत पोलिसांनी शनिवारी घाटकोपरमधून तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांचा चरस जप्त करत त्याची विक्री करणाऱ्या जावेद मोहम्मद शेख उर्फ जिदा याला अटक केली आहे.


पोलिसांनी रचला सापळा

घाटकोपर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी शेख लाखो रुपयांची चरस विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी घाटकोपर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. सोबतच 7 लाख 80 हजार रुपयांचे चरस देखील जप्त केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनाही या अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. यामध्ये जिदा याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून आरोपीने एवढा मोठा अमली पदार्थांचा साठा आणला कुठून? याची चौकशी घाटकोपर पोलिस करत असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त भीमदेव राठोड यांनी सांगितले.


हेही वाचा - 

घाटकोपरमध्ये चरससह महिलेला अटक

हे ड्रग्ज तुमची मुलंही घेत असतील!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा