डिलेव्हरी बाॅयचं सोंग घेऊन बाॅलिवूड कलाकारांना पुरवत होता ड्रग्ज

त्याच्याजवळ नवोदित सेलिब्रिटींची भली मोठी यादी सापडली आहे. त्यात जाहिरातीत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री शिवाय अनेक मॉडेल्सचा समावेश असल्याचे बोलले जाते.

डिलेव्हरी बाॅयचं सोंग घेऊन बाॅलिवूड कलाकारांना पुरवत होता ड्रग्ज
SHARES

एनसीबीने बॉलीवूड (Bollywood ) जगतातील कित्येक सेलिब्रेटींच्याविरोधात ड्रग्स घेत असल्याच्या अनुषंगाने चौकशी करण्याच सत्र चालवल असतानाच मुंबई पोलिसांनी सुद्धा आता ड्रग्स तस्करीच्या विरोधामध्ये एक मोठी मोहीम हाती घेतलीय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका अशा आरोपीला अटक केलेली आहे जो डिलिव्हरी बॉय (Delivery Boy ) च सोंग घेऊन लॉकडाऊनच्या काळामध्ये कित्येक सेलिब्रिटींच्या घरात जाऊन ड्रग्स पुरवत असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय.

हेही वाचाः- मनसेचे मुद्दे रोकठोक पण…

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर अनेक दिग्गज अभिनेत्रींची नावे पुढे आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दिपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रित सिंह, रिया चक्रवर्ती यांची एनसीबीने चौकशी करत, त्याचा जबाब नोंदवून घेतला. मात्र ड्रग्जचे हे कनेक्शन बाॅलिवूड बड्या कलाकारांपासून ते नवोदितांपर्यंत पसरले असल्याचे मुंबई पोलिसांनी केलेल्या एका कारवाईतून समोर आले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर अनेक कलाकारांची नावे उजेडात आली. मात्र तरीही ड्रग्ज तस्करीही (Drug trafficking ) सुरूच होती. प्रत्यक्ष भेटून ड्रग्ज देणं शक्य नसल्यामुळे तस्करांनी अनोखा मार्ग वापरला होता. पोलिसांची चौफेर नजर चुकवून तस्करांनी ड्रग्ज पुरवण्यासाठी डिलेव्हरी बाँयचे सोंग घेतले होते. मात्र याची कुणकुणही पोलिसांना लागली.

हेही वाचाः- बलमवा बंबई गईल हमार!

अखेर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी सापळा रचून एका डिलव्हरी बाॅयला ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ अटक केली. उस्मान अली शेख असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याच्याजवळ नवोदित सेलिब्रिटींची  भली मोठी यादी सापडली आहे. त्यात जाहिरातीत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री शिवाय अनेक मॉडेल्सचा समावेश असल्याचे बोलले जाते. अटक आरोपीची चौकशी केल्यानंतर तो ज्या ठिकाणी ड्रग्स पुरवत होता त्या सगळ्यांची येत्या काळात चौकशी होण्याची सुद्धा शक्यता आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा