साप दंशानंतरही तिने वाचवले मुलीचे प्राण

रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना दुपारच्या सुमारास सुलताना आणि तेशीन घरी झोपल्या होत्या. त्याचवेळी घरात एका कोपऱ्यातून आलेल्या एका सापाने तेशीनला दंश केला.

साप दंशानंतरही तिने वाचवले मुलीचे प्राण
SHARES
मुंबईतल्या धारावी परिसरात सापाने दंश केलेल्या मुलीला वेळीच उपचार मिळावे यासाठी आईने प्रयत्नांची पराकष्ठा केली. मुलीला सापाने दंश केल्यानंतर आईला दंश केला. मात्र, आईने मुलीला घेऊन कसेबसे हाॅस्पिटल गाठले. सुलताना खान (३२), तेशीन खान (१८) अशी या दोघींची नावे आहेत. सध्या दोघींवर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


झोपेत दंश

धारावीच्या राजीव गांधीनगरमध्ये सलीम पत्नी सुलताना आणि मुलगी तेशीन सोबत राहतात. रविवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना दुपारच्या सुमारास सुलताना आणि तेशीन घरी झोपल्या होत्या. त्याचवेळी घरात एका कोपऱ्यातून आलेल्या एका सापाने तेशीनला दंश केला. त्यावेळी तिने केलेल्या आरडा ओरडानंतर सुलताना यांना जाग आली. साप तेशीनाच्या जवळ असल्याचे पाहून सुलताना यांच्या पायाखालची जमिनच सरकली. तेशीनाला सापापासून दूर नेत असताना सापाने सुलतानालाही दंश केले.


सुलतानाने हिंमत दाखवली

सापाने दंश केल्यानंतर तेशीनाला अस्वस्थ वाटू लागले. वेळीच सुलताना यांनी तेशीनाला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे सापाने सुलताना यांनाही दंश केल्याने त्यांचीही प्रकृती खालावत होती. त्या अवस्थेत सुलताना यांनी टॅक्सीने सायनचे लोकमान्य टिळक रुग्णालय गाठत तेशीनाला रुग्णालयात दाखल केले आणि त्या बेशुद्ध पडल्या. काही तासानंतर शुद्धीवर आलेल्या सुलताना यांनी डाॅक्टरांना घडलेला प्रकार सांगितला. दोघीही सध्या सुखरूप असून सुलतानाच्या हिंमतीची  सध्या रुग्णालयात चर्चा सुरू आहे.



हेही वाचा -

अल्पवयीन मुलींना पुन्हा कुंटनखाण्यात सोडलं, निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला अटक

लाखोंच्या कोकेन तस्करी प्रकरणी परदेशी महिलेला अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा