सुशांत आत्महत्या प्रकरणात न्यायवैद्यक शाळेच्या अहवालातून स्पष्ट झाली ‘ही’ बाब

४७ दिवस उलटले, तरी सुशांतने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप ही गुलदस्त्यात

सुशांत आत्महत्या प्रकरणात न्यायवैद्यक शाळेच्या अहवालातून स्पष्ट झाली ‘ही’ बाब
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. या प्रकरणात सुशांतने ज्या कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतला होता. त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर न्यायवैद्यक प्रयोग शाळेचा अहवाल आला आहे. या प्रकरणा आतापर्यंत पोलिसांनी तब्बल ४१ जणांचे जबाब नोंदवले असून आता बिहार पोलिसही या प्रकरणाचा समांत्तर तपास करणार आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना गरज वाटेल त्याची चे चौकशी करतील असे यापूर्वीच सांगितले आहे. 

हेही वाचाः- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, धर्मा प्रोडक्शनचे अपूर्व मेहताची पोलिसांकडून चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथे राहत्या घरी कपड्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने बॅलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेला काल ४७ दिवस उलटले. तरी सुशांतने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप ही गुलदस्त्यात आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याने ज्या कापडाच्या ओढणींने गळफास घेतला होता. ती कापडाची ओढणी सुशांतचे वजन पेलवू शकते का, सुशांतला काही विषारी पदार्थ देण्यात आला होता. त्याचा अहवाल आता न्यायवैद्यक प्रयोग शाळेकडून प्राप्त झाला आहे. या अहवालात न्याय वैद्यक प्रयोग शाळेने सुशांतच्या वजना इतकी वस्तू अडकवून तिने त्या कापडी ओढणीची चाचपणी केली. त्याच बरोबर त्याच्या अवयवांचीही तपाणी केली. त्यावेळी न्याय वैद्यक प्रयोग शाळेला त्यात कोणतेही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आलेली नसल्याचे अहवालात म्हटंल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्रात ‘इतके’ वाघ वाढले!

दरम्यान सुशांतच्या आत्महत्या मागील कारण शोधण्यासाठी मुंबई पोलिस शर्तीचे प्रयत्न करत असताना. सुशांतचे वडिल कृष्णा सिंह यांनी बिहार पोलिस ठाण्यात सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीवर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. रियाच्या भावाचाही पोलिसांनी जबाब नोंदवला असल्याचे कळते. तसेच बिहार पोलिस सध्या सुशांतची गोरेगाव येथे राहणारी बहिण मितू सिंह हिचा जबाब नोंदवण्यासाठी गेले आहेत. या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण मिळत असून मुंबई आणि बिहार पोलिस समातंर तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा