नोकरी मागण्यासाठी आलेल्या तरुणावर जुहूत अनैसर्गिक अत्याचार


नोकरी मागण्यासाठी आलेल्या तरुणावर जुहूत अनैसर्गिक अत्याचार
SHARES

जुहू पोलिसांनी ४५ वर्षीय सुरक्षा रक्षकाला एका तरूणावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. ललित मिश्रा असं या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. नोकरी देण्याचं आमिष दाखवून या तरूणावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

हा २१ वर्षीय पीडित तरूण मूळचा झारखंडला राहणारा आहे. तो नोकरीच्या शोधासाठी मुंबईत आला होता. शुक्रवारी जुहू येथे नोकरीच्या शोधात असताना त्याची ओळख ललित मिश्रा नावाच्या सुरक्षा रक्षकाशी झाली. त्यानं या तरुणाला नोकरी देतो असं सांगून दिवसभर फिरवलं आणि रात्री तो नोकरी करत असलेल्या सी-क्लिफ इमारतीतील एका रुममध्ये राहायला सांगितलं.

या तरूणाला देखील राहायला जागा हवीच होती. त्यामुळं हा तरूण तेथे थांबला खरा; मात्र रात्रीच्या वेळेस या सुरक्षा रक्षकाचं खरं रूप समोर आलं. रूममध्ये आल्यावर मिश्रानं या तरूणावर जबरदस्तीनं अनैसर्गिक अत्याचार करण्यास सुरूवात केली. या तरूणानं त्याला प्रतिकार करत कशीबशी त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि थेट सांताक्रूझ पोलीस ठाणे गाठलं.

पीडित तरूणावर जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार करण्यात आले होते. मात्र तरीही सांताक्रूझ पोलिसांनी या प्रकाराचं गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल केला आणि हा गुन्हा जुहू पोलीस ठाण्याकडं सोपवला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ ललित मिश्राला अटक केली. मिश्रा सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.



हे देखील वाचा -

चालत्या लोकलमध्ये तरूणीला बलात्काराची धमकी देणारा गजाआड

सुरक्षा रक्षकानंच केली घरात चोरी!



 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा