चोरीचं प्लानिंग फसलं, लाखो रुपयांचे एसी, एलईडी हस्तगत

कुर्ला पोलिसांनी कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर एका कंटेनरमधून तब्बल ७४५ एलईडी टीव्ही आणि ८० एअर चोरीचे कंडिशन हस्तगत केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शादाब खान नावाच्या चोराला अटक केली.

चोरीचं प्लानिंग फसलं, लाखो रुपयांचे एसी, एलईडी हस्तगत
SHARES

कुर्ला पोलिसांनी कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर एका कंटेनरमधून तब्बल ७४५ एलईडी टीव्ही आणि ८० एअर चोरीचे कंडिशन हस्तगत केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शादाब खान नावाच्या चोराला अटक केली असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

प्रसिद्ध एलजी कंपनीचे नवीन एलईडी टीव्ही आणि एसीमध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्यामुळे त्यांना रांजणगाव येथील कंपनीतून भिवंडी येथील कंपनीच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यासाठी पाठवण्यात आले. या वस्तू सुरक्षितरित्या पोहचवण्याचं काम कंपनीने एनएलएस कंपनीला दिलं होतं. या लाखो रुपयांच्या वस्तू ज्या कंटेनरमधून जाणार होत्या, त्या कंटेनरला जीपीएस सिस्टम लावण्यात आलं होतं.


'अशी' झाली चोरी

त्यानुसार शनिवार १७ फेब्रुवारी रोजी ८१७ एलईडी टीव्ही आणि ८० एसी घेऊन हा कंटेनर रांजणगावहून भिवंडीच्या दिशेने निघाला. मात्र हा कंटेनर कळंबोली इथं पोहोचल्यावर चालकाने कंटेनर रस्त्यात थांबवून जीपीएस सिस्टिम डिस्कनेट केलं.

त्यानंतर मध्यरात्री कंटेनर घेऊन चालक धारावीत आला. त्या ठिकाणी त्याने एका ओळखीच्या व्यक्तींकडे ७२ एलईडी टीव्ही उतरवून तो कुर्लाच्या दिशेने निघाला. मात्र धारावीत उतरवलेले ७२ चोरीचे एलईडी घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या ट्रकला उशीर झाला. त्याचवेळी धारावी पोलिसांची गस्तीची गाडी त्या ठिकाणी आली. पोलिसांची गाडी पाहून एलईडी टीव्हीजवळ थांबलेल्या चोरांनी एलईडी रस्त्यात सोडून तिथून पळ काढला.


'असा' झाला उलगडा

पोलिसांनी एलईडी ताब्यात घेऊन घटनेची माहिती नियंञण कक्षाला दिली. त्याच वेळी कुर्लाच्या एलबीएस रोडवर एक कंटेनर थांबलेला कुर्ला पोलिसांना आढळला. पोलिसांना कंटेनरमधील चालक आणि इतर दोघांच्या संशयित हालचालींमुळे त्यांना हटकलं. त्यावेळी मुख्य आरोपी चालक आणि एकाने तिथून पळ काढला. मात्र पोलिसांना शादाब नावाच्या चोराला पकडण्यात यश आलं. शादाबच्या चौकशीतून पोलिसांना या चोरीचा उलघडा झाला.


झटपट श्रीमंत होण्यासाठी

शादाबने दिलेल्या माहितीनुसार कंटेनर चालकाला झटपट श्रीमंत व्हायचं होतं. त्यानुसार त्याने या चोरीचा कट आखला. आपल्याला कळंबोली इथं अनोखळी चोरांनी अडवून बंदुकीच्या धाकावर लुटलं. कंटेनरमधील वस्तूंसोबत पैसे आणि मोबाईल काढून घेतल्याचं तो पोलिसांना सांगणार होता. मात्र त्याचा कट फसला आणि मी पकडलो गेल्याची कबुली शादाबने पोलिसांना दिली.

या कटातील मुख्य आरोपी चालक अद्याप फरार असून कुर्ला पोलिस त्याचा शोध घेत आहेत. चोरीचे हे टीव्ही आणि एसी कमी दरात ते छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना विकणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हेही वाचा-

पीएनबीच्या आणखी 3 बड्या अधिकाऱ्यांना अटक

चिन्मयी सुमितसमोर विकृत चाळे करणाऱ्यास अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा