वाधवान बंधूसह २३ जणांवर गुन्हा दाखल

वाधवान बंधू (wadhawan brother), त्यांचे कुटुंबिय आणि नोकर अशा एकूण २३ जणांवर संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाधवान बंधूसह २३ जणांवर गुन्हा दाखल
SHARES

येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यात सध्या जामिनावर असलेले दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (DHFL) संस्थापक वाधवान बंधू (wadhawan brother), त्यांचे कुटुंबिय आणि नोकर अशा एकूण २३ जणांवर संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुणाकुणचा समावेश ?

वाधवान कुटुंबातील कपिल वाधवान, अरूणा वाधवान, वनिता वाधवान, टिना वाधवान, धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा वाधवान, युव्हिका वाधवान, आहान वाधवान यांसह त्यांच्या सोबत आलेले त्यांचे कर्मचारी शत्रुघ्न घाग, मनोज यादव, मनोज शुक्ला, अशोक वाफेलकर, दिवान सिंग, अमोल मंडल, लोहीत फर्नांडीस, जसप्रित सिंग, जस्टीन डिमेलो, इंद्रकांत चौधरी, एलिजाबेथ अय्यपिल्लई, रमेश शर्मा, प्रदिप कांबळे व तारका सरकार या सर्वांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ब, महाराष्ट् कोविड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे तसंच भादंवि कलम १८८, २६९, २७०, ३४ नुसार महाबळेश्वर पाेलीस ठाण्यात गुन्हा (mahabaleshwar police station) दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- शरद पवारांच्या सांगण्यावरून वाधवान कुटुंबाला पत्र? किरीट सोमय्यांचा प्रश्न

होम क्वारंटाइन

प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांच्या तक्रारीनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशीरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यासोबत वाधवान कुटुंबाने खंडाळा ते महाबळेश्वर प्रवासासाठी वापरलेल्या ५ अलिशान गाडया पांचगणी इथून जप्त करण्यात आल्या आहेत. तर या २३ जणांना गुरूवारी मध्यरात्रीच पांचगणी येथील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या इमारतीमध्ये इन्स्टीटयुशनल क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यात जामिनावर असलेल्या वाधवान बंधूंवर सीबीआयचा लूकआऊट वॉरंट जारी असून त्यांची ईडीकडून चौकशीही सुरू आहे. असं असतानाही वाधवान बंधू आपलं कुटुंब व नोकरचाकरांसह खंडाळ्याहून महाबळेश्वरला गेले होते. तिथं त्यांना पकडण्यात आल्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आलं. गृहविभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता (principal secretary amitabh gupta) यांनी दिलेल्या पत्रात वाधवान बंधूंचा उल्लेख 'माझे फॅमिली फ्रेंड' असा करत त्यांच्या ५ गाड्यांसाठी विशेष पास इश्यू केला होता. या सर्वांना कौंटुबिक अत्यावश्यक कारणासाठी खंडाळा येथून महाबळेश्वरला जायचं आहे, असंही पासवर नमूद करण्यात आलं होतं. हे प्रकरण बाहेर आल्यावर गृहमंत्र्यांनी गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- अमिताभ गुप्तांचा कर्ता करविता कोण? भाजपचा गृहमंत्र्यांना सवाल


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा